नवरोझ
नवरोझ म्हणजे पारशी नववर्ष. नवरोझ इंग्रजीमध्ये Novruz, Nowrouz, Nooruz, Navruz, Nauroz किंवा Nevruz अश्याप्रकारे विविध पद्धतीत लिहिले जातात.
सांस्कृतिक दृष्टीनी महत्वाच्या असलेल्या ह्या पारशी सणासाठी अनेक देशांनी पुढाकार घेऊन ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ह्या देशांमध्ये भारत, इराण,पाकिस्थान, उजबेगीस्थान, अझरबैजान, किर्गीजस्थान आणि तुर्कस्थान ह्यांचा समावेश आहे.
विशाल भौगोलिक क्षेत्रावर वसंत ऋतूच्या आगमनासाठी दरवर्षी नवरोझ हा 21 मार्चला साजरा केला जातो. नवरोझ हा स्थानिक परंपरांशी निगडित असलेला सण आहे जो पारशी स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने जातन केला आहे. नवरोझ हा जमशेदच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Intangible Heritage of India -Nawrouz
हा सण एका विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो. ह्यात पारंपरिक गाणी, खेळ, पारशी लोकांची खाद्यसंस्कृती, रांगोळ्या, कथा ह्यांचा समावेश होतो. घोड्यांच्या शर्यती, कुस्ती सारखे खेळही खेळले जातात. ह्याशिवाय पाण्यावरून, आगीवरून उड्या मारणे, आगीवरून चालणे असे चित्तथरारक खेळही खेळले जातात. धार्मिक विधींमध्ये शांतता, मैत्री आणि शेजारधर्मासाठी, सर्व मानवजमातींमध्ये शांतात प्रस्थापित होण्यासाठी प्रार्थना केल्या जातात. घराबाहेर मेणबत्या प्रज्वलित केल्या जातात.
2009 साली नवरोझ ह्या पारशी सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात केरळ मधील मुडीयट्टू म्हणजे काय ते बघूया.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
2 Responses
[…] अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात नवरोझ ह्या पारशी सणाविषयी जाणून […]
[…] नवरोझ […]