स्वाध्याय सुधा

Home \ स्वाध्याय सुधा
Jul 23

स्वाध्याय सुधा सूत्र 10 महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती

भगवान शिव म्हणजे परमतत्त्व. या परमशिवाचे तत्त्वरूप अत्यंत व्यापक आणि कल्याणकारी आहे. शिवस्वरूप म्हणजे खरतरं निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् असे आहे. शिव तत्त्वाचा अर्थबोध शब्दांच्या परीघा पलीकडे जाऊन चित्ताला तुष्टी देणारा आहे. भगवान शिवाला शिवो गुरुः शिवो वेदः शिवो देयः शिवः प्रभुः म्हणताना, प्रथम गुरु म्हणून संबोधले आहे. सर्व शास्त्र, विज्ञान, विद्या आणि कला […]
Jul 16

स्वाध्याय सुधा सूत्र 9 कलादेवी नमस्तुभ्यं – रूपभेद

कला म्हणजे काय? कला म्हणजे माणसाच्या सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद आहे. – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद हे भारतीय कलेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. यथार्थ दर्शनाचे अनुकरण हा भाग भारतीय चिंतनामध्ये अभिप्रेत नाही. भारतीय दर्शन परंपरा असो वा कला परंपरा आत्मचैतन्य जाणण्याची ही प्रक्रिया सर्वत्र समांतर चालते. आत्मतत्त्व जाणण्याचे आणि ते […]
Jul 09

स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

‘कला’ या शब्दाची व्याप्ती अपार आहे. कलेसारखी दिव्य शक्ती माणसाच्या जीवनाला सौंदर्य, उल्हास, लालित्य, प्रतिभेने संपन्न करते. कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती जिथे येते, तिथे कलात्मक नवसृजन दिसतेच. कला म्हणजे नित्य साधना आणि नित्य चिंतन यांतून प्रगल्भ होत जाणाऱ्या अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे कलासाधनेत कोणतेच हमरस्ते उपयोगी पडत नाहीत. कोणत्याही कलाकृतीचे सृजन होताना अनेकविध क्रिया या कार्यरत […]
Jun 25

स्वाध्याय सुधा सूत्र 7 सुमनत्वाची कामना

आपण सर्वच समूहप्रिय लोक आहोत. पण केवळ समूह म्हणजे समाज नव्हे. एक सातत्यशील आणि सहकारी सामाजिक समूह ज्यांच्यामध्ये कार्य साध्य करण्यासाठी सुसंघटीत असा आकृतिबंध तयार झाला आहे, त्याला समाज म्हणता येईल. या समाजात राहून आपण आपले जीवन अधिक उन्नत करण्याच्या दृष्टीने संस्कृती आपल्याला सामाजिक भान देते. असे सामाजिक भान वैदिक काळातील समाजात निर्माण होत होते, […]
Jun 18

स्वाध्याय सुधा सूत्र 6. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 2)

सिद्धांत आणि साधना यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या या योगदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः या स्वाध्याय सुधाच्या पूर्वसूत्रामध्ये आपण योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास पाहिला. याशिवाय योगदर्शनाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेतले. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे नेमके काय? आणि योगसूत्रातील या सूत्रामध्ये आलेल्या चित्तवृत्ती कुठल्या हेही पाहिले. स्वाध्याय सुधाच्या या सूत्रामध्ये आपण या चित्तवृत्तींचा क्षय करण्याचे साधन कोणते […]
Jun 11

स्वाध्याय सुधा सूत्र 5. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1)

योगशास्त्र म्हणजे भारतीय संस्कृतीला लाभलेली अत्यंत व्यापक आणि विज्ञानाधीष्टीत अशी दीर्घ परंपरा आहे. केवळ भारतच नव्हे तर हे संपूर्ण विश्व या योग शक्तीने एकजूट होत आहे. योगशास्त्राचे मर्म केवळ जाणून समजणार नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून योग म्हणजे नेमके काय? हे समजेल. योग हा शब्द युज् या धातूपासून बनला आहे. युज् धातूचा अर्थ होतो, जोडणे किंवा […]
Jun 04

स्वाध्याय सुधा सूत्र 4. श्रुती आणि दृष्टी

नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे | वसत्वम् मम जिव्हाग्रे, सर्वविद्याप्रदाभव । देवी शारदेला माझा नमस्कार असो, ही देवी म्हणजे बुद्धीदात्री सरस्वती. जी माझ्या जिव्हाग्रावर वास करून, मला सर्व विद्या अवगत करून देणारी होवो, अशी प्रार्थना देवी सरस्वतीला आपण करतो. बुद्धी, मति, प्रज्ञा, मेधा या मनुष्याच्या ज्ञान साधनेतील दिव्य ज्योती आहेत. या ज्योतींच्या तेजाने मनुष्याच्या जीवनातला अज्ञानाचा […]
May 28

स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेचा आरंभ श्रीगणेशाच्या स्तवनाने होतो. या मंगलाचरणामध्ये माउली एक एक ओवीमधून शब्दब्रह्म गणेशाचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करीत जातात. जसे हे शब्द आकार घेतात, तशी श्रीगणेश प्रतिमा आपल्या मनःपटलावर साकार होत जाते. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व सूत्राच्या पूर्वार्धामध्ये या वेदाधिष्टीत श्रीगणेशाचे मूर्तरूप, त्याच्या देहावर सजलेले पुराणोक्त काव्य, नाट्यादिकांचे वस्त्रालंकार आपण बघितले. आज या […]
May 21

स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।। 1 ।। कोणत्याही कार्याचा आरंभ, आपण श्रीगणेशाच्या पूजनाने करतो. गणेश या देवतेचा दैवतशास्त्रीय विचार स्वतंत्रपणे करणे उचित ठरेल. आजच्या स्वाध्याय सुधाच्या या भागात मात्र श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्वाचा विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.  भगवान श्रीकृष्णाने मुखर केलेली श्रीमद् भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या अलगद, हळुवार शब्दांमधून […]
May 14

स्वाध्याय सुधा सूत्र 1. आरंभ

भारतविद्या सारखा विषय, म्हणजे खरतर अनेकविध विषयांचा एक समुच्चय. ही विद्याशाखा अंतःविषय (Interdisciplinary) म्हणजे अनेक वेगवेगळ्या ज्ञानशाखा संगठीतपणे अभ्यासण्याची, अश्या स्वरूपाची आहे. मी खरतर दृश्यकलेमुळे, प्राचीन भारतीय कलेकडे अधिक ओढली गेले. त्यातूनच आज प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य आणि प्रतिमा विज्ञान या विषयामध्ये संशोधन करते आहे. औंढा नागनाथ देवालयासारखे बृहद् देवालय अभ्यासायला घेणे, ही माझ्या वैचारिक […]