Archives for April, 2017

Home \ 2017 \ April
Apr 22

पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

पंजाब, भारतातील उत्तर पश्चिमी भाग हा तिथल्या मेहनती लोकांसाठी आणि तिथल्या दमदार संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अमृतसर जवळील जन्दियाला गुरु, पंजाब इथे एक विलक्षण संस्कृती बघायला मिळते जी फाळणीनंतरच्या स्थलांतराचा परिणाम आहे. जन्दियाला गुरु ह्या ठिकाणी काही लोकं तांबे, पितळ आणि काही मिश्रधातू ह्या पासून पारंपारिक पद्धतीने भांडी बनवण्यात कुशल आहेत. तांबे, पितळ सारख्या धातूंचे मोडीत घातलेल्या […]
Apr 21

संकीर्तन

सत् युगामध्ये विष्णूच्या ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञीय समर्पणाने, द्वापार युगामध्ये भगवंताच्या चरण सेवेने जे फळ प्राप्त होईल तेच कलीयुगामध्ये केवळ संकीर्तनाने साध्य होईल, हे मानणारी परंपरा म्हणजे मणिपुरमधील संकीर्तन. इ.स. 15 शतकात मणिपूरचा राजा भागचन्द्र सिंह ह्याने संकीर्तन जनसामान्यात रुजवले. संकीर्तन म्हणजे ज्ञानाचे माध्यम मानणाऱ्या वैष्णव पंथीय लोकांची परंपरा आहे. मणिपुरी लोक यज्ञीय समर्पण किंवा […]
Apr 20

बौद्ध पठण परंपरा, लडाख

बौद्ध धर्मशाळा आणि लडाख मधील गावात बौद्ध लामा किंवा धर्मगुरू, त्यांच्या पवित्र मंत्राचे पठाण करतात. हे पवित्र मंत्र त्यांचे तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण सांगणे आहे. लडाखमध्ये महायान आणि वज्रयान ह्या पंथाची उपासना चालते. त्यापैकी चार महत्वाचे संप्रदाय मानले जातात. हे संप्रदाय म्हणजे न्यागम, कागयुड, शाक्य आणि गेलूक. प्रत्येक संप्रदायाची मंत्र पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे. हे […]
Apr 19

छउ नृत्य

पूर्व भारतातील एक नृत्य प्रकार म्हणजे छउ. छउ ह्या नृत्यामध्ये महाभारत आणि रामायण किंवा कधीकधी स्थानिक लोकांच्या कथा सादर केल्या जातात. छउ ह्याचा संस्कृत शब्द होतो, छाया म्हणजे सावली किंवा छावणी. ही नृत्यशैली वडील आपल्या मुलाला शिकवतात आणि हा वारसा पुढे प्रवाहित होतो. नृत्य लढाऊ शैलीचे असल्याने ह्यात उत्साहपूर्ण  हालचाली आणि प्रचंड ताकद आवश्यक असते, त्यामुळे […]
Apr 17

कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

राजस्थानमधील साप पकडणाऱ्या कालबेलिया लोकांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत आहे. कालबेलिया हे भटक्या जमातींपैकी एक असून ते जिथे राहतात त्यांना डेरा म्हणतात. हे गरुडी लोकं त्यांच्या जवळच्या वेतापासून बनवलेल्या टोपीतून सापांना घेऊन गावातील घराघरातून दानं मागत फिरतात. कालबेलिया जमातीचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे. कालबेलिया जमातीच्या लोकांसाठी त्यांची परंपरा, हा अभिमानाचा विषय आहे. कालबेलिया जमातीमधील […]
Apr 16

मुडीयट्टू

मुडीयट्टू हा केरळ मधील मंदिरात सादर होणारा धार्मिक नृत्य, नाट्य प्रकार आहे.  देवी काली आणि क्रूर राजा दारूक यांच्या युद्धप्रसंगावर आधारित पौराणिक कथेशी संबंधित हा विधी आहे. हा धार्मिक विधी हा स्थानिक समुदाय एकत्र येऊन साजरा करतात. मुडीयट्टू सदरीकारंचा मूळ हेतू शुद्धीकरण आणि नवीन उत्साह जनसामान्यात राहावा हा आहे. उन्हाळी पिकांच्या कापणी नंतर एका ठराविक दिवशी […]