Archives for January, 2017

Home \ 2017 \ January
Jan 30

अमूर्त वारसा, भारताचा

एखाद्या समाजाची एक वैशिष्टपूर्ण रचना, जगण्याच्या पद्धती या एका ठराविक मूल्यांवर आधारित असतात. धर्म, तत्त्वज्ञान, राजकीय किंवा सामाजिक व्यवस्था, साहित्य, शास्त्रे, कला, नीती, कायदा आणि त्या मागची मूल्ये म्हणजे त्या विशिष्ट प्रदेशातील ती संस्कृती असते. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आणि अखंडित परंपरा असलेली संस्कृती आहे. त्यामुळे भारताप्रमाणे इतकी अखंडित परंपरा लाभलेले संस्कृती जगभरात बघायला मिळत […]
Jan 27

प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 2)

भाग 1 – प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भीमबेटकातील चित्रांची अभिव्यक्ती प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भाग 1 मध्ये आपण बघितलं की वि.श्री. वाकणकरांना भीमबेटका ह्या शैलाश्रयांचा शोध कसा लागला. त्यांनी आणि इतर अभ्यासकांनी भीमबेटकाचा एक नवा पैलू कसा मांडला. ह्या भागात आपण ह्या शैलाश्रयांमधील चित्रांविषयी माहिती बघणार आहोत. इथली कला आपल्याला तत्कालीन माणसाविषयी नेमकं काय सांगू बघते […]
Jan 26

राजसत्तेच्या सामर्थ्याचे कलात्मक प्रतिक

खूप वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक गोष्ट घडली. खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 70 वर्षांपूर्वी. 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना अंमलात आणली गेली आणि आजच्याच दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे 26 जानेवारी 1950 साली भारताचे राजकीय चिन्हे स्वीकारले गेले. चिन्हे किंवा प्रतिके ही एक प्रकारची साधने आहेत, जी माणसाला त्या प्रतिकांमागाचा अर्थ समजून घेण्यासाठी […]
Jan 20

प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 1)

कला म्हणजे अभिव्यक्ती असते. कलेच्या माध्यमातून माणूस त्याच्या अव्यक्त भावनांना अभिव्यक्त करून अर्थपूर्ण संकेतांचे आदानप्रदान करतो. मग ही अभिव्यक्ती त्याच्या धार्मिकतेशी निगडीत असले किंवा त्याला वाटणाऱ्या भीतीशी निगडीत असेल, त्याच्या सृजनात्मक विचारांचा अविष्कार असेल किंवा त्याच्या सौंदर्यदृष्टीची साकार प्रतिमा असेल. मानव कायमच त्याच्या चित्रांच्या सहाय्याने व्यक्त होत आला आहे. ह्याच चित्रांचे बारकाईने निरीक्षण केले तर […]
Jan 12

असाही एक इतिहास

खरं तर मी इतिहासाशी शाळेत असतानाच कट्टी घेतली होती. आणि शक्यतो परत कधी आम्ही दोघं (म्हणजे मी आणि इतिहास हा विषय) जवळ येणार नाही याचे अनेक प्रयत्न केले. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. शाळेनंतर थेट लग्न झाल्यावर मी पुन्हा M.A पदविका अभ्यासक्रम शिकायला सुरु करेन असं वाटलं नव्हतं.  त्याहूनही जे नवल होतं ते म्हणजे […]
Jan 06

आपली संस्कृती

कोणी आपल्याला आपला परिचय विचारला की आपण स्वतःचा परिचय यथायोग्य करून देतो. पण खरचं आपल्या स्वतःची ओळख आपल्याला स्वतःला पटली आहे का? असा प्रश्न किती लोकांच्या मनात डोकावतो? स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर आधी आपल्या संस्कृतीची ओळख होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून म्हणजे सुमारे हजारो वर्षांपासून अविरत प्रवाहित होत आलेली संस्कृती आहे. […]