Archives for November, 2017

Home \ 2017 \ November
Nov 25

लहान मुलं आणि वारसा

आपली संस्कृती आपला वारसा ह्या लेख मालिकेच्या पहिल्याच भागात आपण पाहिलं होतं की वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट, परंपरा, वस्तू किंवा वास्तू. हा वारसा भविष्यात आपण आपल्या भावी पिढीला सुपूर्त करणार असतो. पण हा वारसा आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये देताना, आपण किंवा आपल्या पूर्वजांनी इतके वर्ष हा वारसा का जपला? […]
Nov 23

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 3)

आपला वारसा आपली संस्कृती भाग 1 मध्ये वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आपला वारसा आपली संस्कृती भाग 2 मध्ये पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष, लेणी आणि संग्रहालये ह्या वारसा घटकांची माहिती करून घेतली. आज तश्याच काही वेगळ्या मुद्दांवर आपण नजर टाकूया. ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष यांचा विचार केला […]
Nov 20

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपला वारसा आपली संस्कृती या लेखाच्या कालच्या भागात बघितले. आज आपण प्रत्यक्ष वारसा आणि त्याच्याशी निगडीत इतर घटकांची माहिती बघणार आहोत. या घटकांची, स्थळांची काही परिचित- अपरिचित वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तो वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपली कर्तव्ये आणि जबाबदारी काय आहे, हे बघणार आहोत. छोट्या-छोट्या गोष्टीही वारसा […]
Nov 19

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे […]