बोधसूत्रबद्दल थोडेसे

Home \ बोधसूत्रबद्दल थोडेसे

भारतीय संस्कृतीच्या ह्या चिकित्सक शोधाला मी बोधसूत्र म्हणते. सूत्र म्हणजे धागा आणि बोध म्हणजे ज्ञान, जाणीव, जागृती. प्राचीन भारतीय संस्कृतीचे आघाद ज्ञान आपल्या पूर्वजांनी, अभ्यासकांनी परंपरेने आपल्याला सोपवले आहे. त्या ज्ञानाच्या वृद्धीसाठी आणि ते जतन करून पुढे प्रवाहित होण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने अभ्यासून बोधसूत्राच्या माध्यमातून एकत्रित संकलित करीत आहे. 

बोधसूत्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू उलगडत जाणार आहे. हे संस्कृतीचे मायेचे पदर हे आपल्या आईसारखे हळुवार असावेत, असं वाटलं. त्यात अभ्यासात्मक दृष्टीकोन असला तरी एक आपलेपणाची ऊब असावी म्हणून बोधसूत्र माझ्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतूनच लिहिण्याचे ठरवले.

बोधसूत्र मध्ये वापरले जाणारे Photos दोन स्वरूपात आहेत. जे photos स्वतः स्थळांना भेटी देऊन काढले आहेत त्यावर माझा copywriter टाकण्यात आला आहे. इतर photos हे CC Zero ह्या licenses अंतर्गत वापरले आहेत. बोधसूत्र वरील लेखांत माझी मते, अभ्यास मांडलेला असतो. शिवाय इतर अभ्यासकांची मते लेखांत स्पष्ट नमूद केलेली असतात. आवश्यक लेखांना संदर्भही जोडले जातात.

त्यामुळे बोधसूत्र आणि त्यावरील लेख, छायाचित्रे, रेखाचित्रे तसेच इतर साहित्य यांविषयीचे सर्व हक्क माझ्याकडे अर्थात संकेतस्थळ धारकाकडे राखिव असून कोणत्याही व्यक्तीला बोधसूत्र या संकेतस्थळावरील गोष्टींचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही.

परवानगीसाठी, नवीन संकल्पनांसाठी किंवा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर कौतुक करण्यसाठी आपण bodhsutra {at} gmail {dot} com किंवा sketchywish {at} gmail {dot} com वर ईमेलद्वारा संपर्क करून आपले विचार माझ्यापर्येंत पोहचवू शकता.