समुद्रोद्भव शंख
शंख म्हणजे समुद्रामध्ये निवास करणारा एक जलचर. भारतीय संस्कृतीमध्ये शंखाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतोच. आपल्या धार्मिक विधी, पूजा – अनुष्ठानामध्ये शंख पावित्र्याचे प्रतिक मानला जातो. भारतीय परंपरेत जितके धार्मिकदृष्टीने शंखाचे महत्त्व आहे तितकेच त्याचे सामजिक अस्तित्वही अगदी प्राचीन काळापासून आपल्याला बघायला मिळते. सिंधूसंस्कृतीचा मागोवा घेतला तर जवळपास इ.स.पूर्व 3,000 वर्षांपूर्वी शंखापासून बनवलेल्या वस्तूंचा पुरावा उत्खननातून […]