Archives for May, 2021

Home \ 2021 \ May
May 28

स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेचा आरंभ श्रीगणेशाच्या स्तवनाने होतो. या मंगलाचरणामध्ये माउली एक एक ओवीमधून शब्दब्रह्म गणेशाचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करीत जातात. जसे हे शब्द आकार घेतात, तशी श्रीगणेश प्रतिमा आपल्या मनःपटलावर साकार होत जाते. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व सूत्राच्या पूर्वार्धामध्ये या वेदाधिष्टीत श्रीगणेशाचे मूर्तरूप, त्याच्या देहावर सजलेले पुराणोक्त काव्य, नाट्यादिकांचे वस्त्रालंकार आपण बघितले. आज या […]
May 21

स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।। 1 ।। कोणत्याही कार्याचा आरंभ, आपण श्रीगणेशाच्या पूजनाने करतो. गणेश या देवतेचा दैवतशास्त्रीय विचार स्वतंत्रपणे करणे उचित ठरेल. आजच्या स्वाध्याय सुधाच्या या भागात मात्र श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्वाचा विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.  भगवान श्रीकृष्णाने मुखर केलेली श्रीमद् भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या अलगद, हळुवार शब्दांमधून […]
May 14

स्वाध्याय सुधा सूत्र 1. आरंभ

भारतविद्या सारखा विषय, म्हणजे खरतर अनेकविध विषयांचा एक समुच्चय. ही विद्याशाखा अंतःविषय (Interdisciplinary) म्हणजे अनेक वेगवेगळ्या ज्ञानशाखा संगठीतपणे अभ्यासण्याची, अश्या स्वरूपाची आहे. मी खरतर दृश्यकलेमुळे, प्राचीन भारतीय कलेकडे अधिक ओढली गेले. त्यातूनच आज प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य आणि प्रतिमा विज्ञान या विषयामध्ये संशोधन करते आहे. औंढा नागनाथ देवालयासारखे बृहद् देवालय अभ्यासायला घेणे, ही माझ्या वैचारिक […]