शिवसूत्र

Home \ शिवसूत्र
Aug 19

कांस्य (ब्राँझ) नटराज प्रतिमा

भारतीय कला इतिहासात धातु प्रतिमांची एक उज्ज्वल परंपरा कायमच गौरवलेली आहे. यामध्येही विशेष करून चोल यांच्या कांस्य प्रतिमा या विशेष लोकप्रिय झाल्या. चोलांप्रमाणेच पल्लवांच्याही कांस्य किंवा धातु प्रतिमा बघायला मिळतात. कांस्य हा तांबे आणि कथिल या धातूंच्या मिश्रणातून तयार होणारा धातु आहे. त्यामुळे दोनही धातु हाताळताना कलाकाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि पारंपारिक कौशल्य यांची पराकाष्ठा या […]
Aug 17

मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर नटराज प्रतिमा बघायला मिळते. अतिशय रेखीव अशी प्रसन्न चर्या असलेली नटराज प्रतिमा आपल्याला मंदिराच्या बाह्यभिंतीवर एका कोनाड्यात शिल्पित केलेली दिसते. शिव […]
Aug 16

ऊर्ध्व ताण्डव

नृत्यप्रिय शिवाची पञ्चकृत्य ही पाच तांडवातून अभिव्यक्त होतात. सृष्टीचे सृजन करण्यासाठी ललित ताण्डव, स्थितीसाठी संध्या ताण्डव, लयासाठी संहार ताण्डव, तिरोधनसाठी त्रिपुर ताण्डव आणि अनुग्रहसाठी ऊर्ध्वताण्डव हे पाच प्रकार आहेत. चिदंबरम् महात्म्यात ऊर्ध्व ताण्डवाशी निगडीत एक कथा येते. या कथेचा प्रभाव हा शिल्पांवरही दिसतो. कथा अशी आहे की, एकदा शिव आणि काली यांच्यामध्ये नृत्याची स्पर्धा लागते. […]
Aug 15

तत् कटीसमम्

स्वस्तिकापसृतः पादः करौ नाभिकटिस्थितौ| पार्श्वनुद्वाहितं चैव करणं तत्कटीसमम् || स्वस्तिक करणाचे संपादन केल्यानंतर पायांना विलग केले जावे. एक हात नाभि जवळ तर दुसरा कटिवर स्थित असेल तसेच पार्श्व भाग उद्वाहित मुद्रेत असल्यास त्याला कटीसम करण म्हणतात. वेरूळ येथील लेणीसमूहांपैकी, रामेश्वर लेणीमध्ये दक्षिणेकडील दालनात, भिंतीवर पश्चिमाभिमुख अशी कटीसमम् नृत्यमग्न नटराज प्रतिमा आढळते. अत्यंत देखणी अशी ही […]
Aug 13

अष्टादशभुज नटराज

वातापी चालुक्य यांच्या काळात निर्माण झालेल्या बदामी येथील लेणी समूहातील लेणी क्र. 1 च्या प्रवेशद्वारावरच ही पूर्वाभिमुख अशी भव्य नटराज प्रतिमा आहे. ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाचे विविध विग्रह इथे बघायला मिळतात. परंतु प्रवेश करतानाच ही नटराजाची चतुर ताण्डव मूर्ती लक्ष वेधून घेते. जवळपास 5 फुट उंचीची ही प्रतिमा नृत्यमग्न शिवाचे दर्शन घडवते. […]
Aug 12

कुञ्चित करण

नटराज शिल्पांमधील एक विलक्षण सुंदर आणि दक्षिणात्य शैलीत लोकप्रिय झालेले म्हणता येईल असे एक करण म्हणजे कुञ्चित करण. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात याची दोन शिल्पे आहेत, याशिवाय पट्टदकल येथेही मला कुञ्चित करण असलेले नटराज शिल्प बघता आले. कैलासनाथ मंदिरामधील दोन्ही शिल्पे उत्कृष्ट आहेत परंतु पट्टदकल येथील शिल्पाची झीज झालेली आहे. तरीही पट्टदकल येथील कुञ्चित करण […]
Aug 10

महानट शिव

आंगिकम् भुवनम यस्य वाचिकं सर्व वाङ्ग्मयम्आहार्यं चन्द्र ताराधि तं नुमः (वन्दे) सात्विकं शिवम् || अर्थात हे संपूर्ण विश्व म्हणजे ज्याचा आंगिक अभिनय आहे, या समस्त विश्वातील वाङ्मय हेच ज्याचा वाचिक अभिनय आहे, हे चंद्र, ग्रह-गोल, तारा आदि ज्याचे आहार्य म्हणजे अलंकार आहेत, त्या सात्विक शिवाला माझे नमन.  अश्या या आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विकं अभिनयाचा […]
Aug 09

उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा […]
Aug 08

वृषभ ताण्डव नटराज प्रतिमा

पाल- सेन शैली म्हणून कीर्ती पावलेल्या शिल्पशैलीतील विलक्षण सुंदर नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. बंगाल, बिहार आणि बांग्लादेश या प्रांतामध्ये या पाल शैलीतील अनेक शिल्पं बघायला मिळतात. या शैलीमध्ये शिल्पांमधील नाजूकपणा आणि सहजता दिसते. विशिष्ट पद्धतीचे गोल चेहरे, बारीक डोळे ही या शैलीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. नटराजाचे एक भिन्न स्वरूप या प्रतिमांमधून अभिव्यक्त होते. पाल […]
Aug 07

ललाटबिम्बावरील नटराज

देवालयात प्रवेश घेताना विविध शाखांनीयुक्त अशी अलंकृत द्वारे आणि त्यांचे विशिष्ट ललाटबिम्ब आपले लक्ष वेधून घेतात. ललाटबिम्ब म्हणजे या द्वारांच्या ललाटपट्टीवर मध्यभागी असलेले देवतेची प्रतिमा. या ललाटबिम्बावर गरुडारूढ विष्णू, उमामहेश्वर, गजलक्ष्मी, गणेश अश्या विविध देवतांच्या प्रतिमा असतात. परंतु पट्टदकल येथील  गलगनाथ मंदिराच्या ललाटबिम्बावर नृत्यरत शिवाचे नटराज स्वरूपातील शिल्पांकन दिसते. ऐहोळे पासून जवळच असलेले पट्टदकल येथील […]