श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः आणि सिंहासन
राजा कालस्य कारणम्, राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः, ना विष्णुः पृथिवीपतिः या आणि अनेक अशा संकल्पनांद्वारे आपणास राजाचे महत्त्व भारतीय इतिहास आणि संस्कृतीमध्ये दिसून येते. भारतीय इतिहास, संस्कृती, राजकारण, लोकाचरण यावर धर्माचा पगडा दिसून येतो. आपल्याकडील साहित्य आणि तत्त्वज्ञानावर सुध्दा धर्माचा पगडा असल्याने धर्मकेंद्री आणि नीतीतत्त्वे यांची परिभाषा स्पष्ट करणाऱ्या साहित्याची निर्मीती प्राचीन काळात […]