#dandapaad_karan

Home \
Aug 16

ऊर्ध्व ताण्डव

नृत्यप्रिय शिवाची पञ्चकृत्य ही पाच तांडवातून अभिव्यक्त होतात. सृष्टीचे सृजन करण्यासाठी ललित ताण्डव, स्थितीसाठी संध्या ताण्डव, लयासाठी संहार ताण्डव, तिरोधनसाठी त्रिपुर ताण्डव आणि अनुग्रहसाठी ऊर्ध्वताण्डव हे पाच प्रकार आहेत. चिदंबरम् महात्म्यात ऊर्ध्व ताण्डवाशी निगडीत एक कथा येते. या कथेचा प्रभाव हा शिल्पांवरही दिसतो. कथा अशी आहे की, एकदा शिव आणि काली यांच्यामध्ये नृत्याची स्पर्धा लागते. […]