तत् कटीसमम्
स्वस्तिकापसृतः पादः करौ नाभिकटिस्थितौ| पार्श्वनुद्वाहितं चैव करणं तत्कटीसमम् || स्वस्तिक करणाचे संपादन केल्यानंतर पायांना विलग केले जावे. एक हात नाभि जवळ तर दुसरा कटिवर स्थित असेल तसेच पार्श्व भाग उद्वाहित मुद्रेत असल्यास त्याला कटीसम करण म्हणतात. वेरूळ येथील लेणीसमूहांपैकी, रामेश्वर लेणीमध्ये दक्षिणेकडील दालनात, भिंतीवर पश्चिमाभिमुख अशी कटीसमम् नृत्यमग्न नटराज प्रतिमा आढळते. अत्यंत देखणी अशी ही […]