#kailasa

Home \
Aug 27

कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज

ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा, कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे. त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे […]
Aug 09

उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा […]