कथा बुद्धजन्माची, एका कथनशिल्पाची
भारताच्या वायव्येकडे स्थित, एक प्रांत म्हणजे गांधार. या प्रांतात बहरलेली कला गांधार कला या नावाने ओळखली जाते. ही कला, म्हणजे पूर्वेकडील भारत आणि पश्चिमेकडील ग्रीक, रोम, इराण आणि शक कलांची सांस्कृतिक समन्वितता आहे. भारताच्यादृष्टीने गांधार या प्रांताचे एक विशीष्ट स्थान आहे. प्राचीन काळात डोकावताना गांधार क्षेत्र राजकीय, धार्मिक आणि कलात्मक स्थित्यांतरचे ते एक प्रमुख केंद्र होते […]