श्री क्षेत्र औंढा नागनाथ
श्री क्षेत्र औंढा नागनाथ (GPS 19°32’13.5″N, 77°02’29″E) म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शैव क्षेत्र. गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्हात, श्री क्षेत्र औंढा येथे भव्य आणि मंत्रमुग्ध करणारे शिल्पसमृद्ध नागनाथ शिवालय आपल्याला बघायला मिळते. समुद्रसपाटीपासून साधारण 464 मीटर उंचीवर नागनाथाचे हे मंदिर आहे. औंढा हे गावं मराठवाड्यातील परभणीच्या नैऋत्येस 36 कि.मी. अंतरावर कळमनुरी या तालुक्यात […]