#nikuttikam_karana

Home \
Aug 24

ऊर्ध्वरेता नटराज

छत्तीसगढ राज्याची जीवनधारा इथे महानदीच्या रूपाने वाहते. या महानदीच्या काठावर सिरपुर येथील गन्धेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवाची ही अष्टभुज नटराज प्रतिमा आहे. गन्धेश्वर महादेव मंदिरात शिवाचे विविध विग्रह, महिषासुरमर्दिनी आणि काही जैन, बौद्ध प्रतिमांचे अवशेष आहेत. या मंदिराचा काळ साधारण 5 वे शतक मानला जातो. या मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या अष्टभुज नटराजाची अत्यंत विशेष अशी ही प्रतिमा […]
Aug 22

वेरूळमधील निकुट्टकम् करण

निकुट्टितौ यदा हस्तौ स्वबाहुशिराशोsन्तरे|पादौ निकुट्टितौ चैव ज्ञेयं तत्तु निकुट्टकम् || भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये निकुट्टन करणाचे लक्षण सांगितले आहे. जेव्हा दोन्ही हात हे बाहू आणि मस्तक यांच्यामध्ये निकुट्टित पद्धतीने संचालित केले जातात आणि त्याच वेळी पाय निकुट्टित होतो त्याला निकुट्टकम् म्हणतात. अभिनवगुप्तपादाचार्य, निकुट्टन याची परिभाषा करताना कोहीलकृत परिभाषेचा आधार घेतात आणि सांगतात, ‘उन्नमनं विनमनं स्यादङ्गस्य निकुट्टनम्’| […]