वेरूळमधील निकुट्टकम् करण
निकुट्टितौ यदा हस्तौ स्वबाहुशिराशोsन्तरे|पादौ निकुट्टितौ चैव ज्ञेयं तत्तु निकुट्टकम् || भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये निकुट्टन करणाचे लक्षण सांगितले आहे. जेव्हा दोन्ही हात हे बाहू आणि मस्तक यांच्यामध्ये निकुट्टित पद्धतीने संचालित केले जातात आणि त्याच वेळी पाय निकुट्टित होतो त्याला निकुट्टकम् म्हणतात. अभिनवगुप्तपादाचार्य, निकुट्टन याची परिभाषा करताना कोहीलकृत परिभाषेचा आधार घेतात आणि सांगतात, ‘उन्नमनं विनमनं स्यादङ्गस्य निकुट्टनम्’| […]