रौद्र रस – काली : नवरस आणि देवी शिल्पे
रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये रौद्र रसाची कर्मे म्हणजे या रसामुळे काय काय होते हे पुढील श्लोकातून व्यक्त करतात – ताडनपाटनपीडनच्छेदनप्रहरणशस्त्र – सम्पातसम्प्रहाररुधिराकर्षणाद्यानि […]