शांत रस – सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे
नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमुनींच्या मते सर्व रसांची परिणीती […]