#siva_nataraja

Home \
Aug 28

मकर तोरणावरील नृत्यरत शिव

मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील […]
Aug 15

तत् कटीसमम्

स्वस्तिकापसृतः पादः करौ नाभिकटिस्थितौ| पार्श्वनुद्वाहितं चैव करणं तत्कटीसमम् || स्वस्तिक करणाचे संपादन केल्यानंतर पायांना विलग केले जावे. एक हात नाभि जवळ तर दुसरा कटिवर स्थित असेल तसेच पार्श्व भाग उद्वाहित मुद्रेत असल्यास त्याला कटीसम करण म्हणतात. वेरूळ येथील लेणीसमूहांपैकी, रामेश्वर लेणीमध्ये दक्षिणेकडील दालनात, भिंतीवर पश्चिमाभिमुख अशी कटीसमम् नृत्यमग्न नटराज प्रतिमा आढळते. अत्यंत देखणी अशी ही […]
Aug 13

अष्टादशभुज नटराज

वातापी चालुक्य यांच्या काळात निर्माण झालेल्या बदामी येथील लेणी समूहातील लेणी क्र. 1 च्या प्रवेशद्वारावरच ही पूर्वाभिमुख अशी भव्य नटराज प्रतिमा आहे. ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाचे विविध विग्रह इथे बघायला मिळतात. परंतु प्रवेश करतानाच ही नटराजाची चतुर ताण्डव मूर्ती लक्ष वेधून घेते. जवळपास 5 फुट उंचीची ही प्रतिमा नृत्यमग्न शिवाचे दर्शन घडवते. […]
Aug 10

महानट शिव

आंगिकम् भुवनम यस्य वाचिकं सर्व वाङ्ग्मयम्आहार्यं चन्द्र ताराधि तं नुमः (वन्दे) सात्विकं शिवम् || अर्थात हे संपूर्ण विश्व म्हणजे ज्याचा आंगिक अभिनय आहे, या समस्त विश्वातील वाङ्मय हेच ज्याचा वाचिक अभिनय आहे, हे चंद्र, ग्रह-गोल, तारा आदि ज्याचे आहार्य म्हणजे अलंकार आहेत, त्या सात्विक शिवाला माझे नमन.  अश्या या आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विकं अभिनयाचा […]
Aug 09

उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा […]