वसंतोत्सव- निसर्गाच्या नवलाईचा सोहळा
हर्ष, उल्हास, आनंद यांचे दुसरे नावं म्हणजे वसंतोत्सव. भारतीय उत्सव म्हणजे आपल्या संस्कृतीच्या लौकिक अंगाचे उत्स्फूर्त दर्शन घडवणारे क्षण. निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याची उधळण करत ऋतुराज वसंत येतो. या वसंताचे पहिले पाऊल पडते ते वसंतपंचमीला. मकर संक्रमणानंतर माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतूचे शुभागमन होते. या वसंतपंचमीचे वेगवेगळे पैलू आपल्या जीवनात चैतन्य आणि उल्हासाचे रंग भरतात. […]