tandava

Home \
Aug 08

वृषभ ताण्डव नटराज प्रतिमा

पाल- सेन शैली म्हणून कीर्ती पावलेल्या शिल्पशैलीतील विलक्षण सुंदर नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. बंगाल, बिहार आणि बांग्लादेश या प्रांतामध्ये या पाल शैलीतील अनेक शिल्पं बघायला मिळतात. या शैलीमध्ये शिल्पांमधील नाजूकपणा आणि सहजता दिसते. विशिष्ट पद्धतीचे गोल चेहरे, बारीक डोळे ही या शैलीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. नटराजाचे एक भिन्न स्वरूप या प्रतिमांमधून अभिव्यक्त होते. पाल […]
Aug 06

मातृकांसह नृत्यरत शिव

ताण्डवप्रिय शिवाच्या एकशे आठ करणांचा उल्लेख भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात येतो. तामिळनाडू येथील चिदंबरम्, तंजावूर येथील बृहदिश्वर, कुम्भकोणम् येथील सारंगपाणी मंदिर आणि सातारा येथील नटराज मंदिर येथे या करणांची शिल्पांमधील अभिव्यक्ती बघायला मिळते. भरतमुनी करण लक्षण सांगताना म्हणतात –  हस्तपादसमायोगो नृत्यस्य करणं भवेत् म्हणजे हस्त आणि पदन्यास यांचे एकत्रित संचलन म्हणजे करण. प्रत्येक करणाचे स्वतःचे असे […]