शुकनासिकेतील नटराज
मंदिर स्थापत्यातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी घटक म्हणजे शुकनास. मंदिराच्या छाद्य भागावर शिखर सुरु होते. या शिखरावर शुकनासिका किंवा महाशुकनासिकेची रचना केलेली असते. ‘शुक’ म्हणजे पोपट आणि ‘नासिका’ म्हणजे नाक त्यामुळे या स्थापत्य घटकाचा आकार हा पोपटाच्या नाकाप्रमाणे असल्याने याला शुकनास असे म्हणतात. या शुकनासिकांमध्ये विविध देवी- देवता किंवा क्वचित सिद्धांची शिल्पे असतात. त्यापैकी नटराज […]