#urdhvajaanu

Home \
Aug 26

औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज

महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा मला नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार आहोत. मंदिराच्या खालाच्या म्हणजे […]
Aug 17

मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर नटराज प्रतिमा बघायला मिळते. अतिशय रेखीव अशी प्रसन्न चर्या असलेली नटराज प्रतिमा आपल्याला मंदिराच्या बाह्यभिंतीवर एका कोनाड्यात शिल्पित केलेली दिसते. शिव […]
Aug 09

उर्ध्वजानु प्रकीर्तितम्

सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा […]