पंजाब, भारतातील उत्तर पश्चिमी भाग हा तिथल्या मेहनती लोकांसाठी आणि तिथल्या दमदार संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अमृतसर जवळील जन्दियाला गुरु, पंजाब इथे एक विलक्षण संस्कृती बघायला मिळते जी फाळणीनंतरच्या स्थलांतराचा परिणाम आहे.
जन्दियाला गुरु ह्या ठिकाणी काही लोकं तांबे, पितळ आणि काही मिश्रधातू ह्या पासून पारंपारिक पद्धतीने भांडी बनवण्यात कुशल आहेत. तांबे, पितळ सारख्या धातूंचे मोडीत घातलेल्या वस्तू वितळवण्यासाठी जमिनीमध्ये मोठ्या भट्ट्या आहेत.
वितळलेल्या धातूला बाहेर काढून लोखंडाच्या साच्यात गार केला जातो. हे छोट्या छोट्या साच्यातील धातूच्या तुकड्यांना साच्यातून बाहेर काढून यंत्राद्वारे आवश्यक जाडीनुसार त्याचे थर केले जातात. ह्या भांड्यांना ठोकून अकार दिला जातो. हातोडीने विविध आकारात भांडी घडवण्याची कला ह्या लोकांना अवगत आहे.
थाळ्या, परात, गोल भांडी, उभट पेले अश्या अनेक आकारात ही भांडी तयार होतात. ह्या बनवलेल्या भांड्यांना चकाकी आणण्यासाठीही पारंपारिक पद्धतीने हाताने, सौम्य अम्लांचा वापर करून नंतर चिंचेच्या पाण्याने चकाकी आणतात. नंतर मातीने भांडी चोळली जातात, इथे हे लोक त्यासाठी पायांचा वापर करतात.
ह्या धातूपासून धार्मिक विधींसाठी उपयोगात आणली जाणारी भांडी वापरली जातात. मधुपर्खा नामक तांबे, झिंक आणि कथील ह्या धातूपासून बनविलेले मिश्र धातूंचे भांडे सुरमा (Kohl) बनवण्यासाठी वापरतात. विजयकंठा नामक तांब्याचे भांडे ज्याचा वापर प्रार्थनेच्यावेळी थाळ वाजवण्यासाठी होतो (Gong). छायापात्र नामक वाटीसारख्या लहान पत्रात तेल भरले जाते. लग्नविधीमध्ये वधु आणि वर त्यांचे प्रतिबिंब ह्यात बघतात.
अल्युमिनियम आणि स्टील ह्यांच्या वाढत्या मागणी मुळे ह्या पारंपारिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ह्याचे दुसरे कारण हेही आहे कि लोकांना दैनंदिन जीवनात ह्या भांड्यांची देखभाल करणे आणि ते स्वच्छ ठेवणे कठीण आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.
त्यामुळेच हळूहळू लुप्त होत चाललेल्या ह्या पारंपारिक कलेला 2014 साली युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.
Photo Credits : UNESCO
2 thoughts on “पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर”