रम्मन हा हिमाचल प्रदेशातील घढवाल प्रदेशातील संरक्षक देवाच्या सन्मानार्थ केला जाणारा धार्मिक सण आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस, हे कृषिप्रधान संस्कृतीतील लोकं रम्मन साजरा करतात.
उत्तराखंडातील सलूर -डुंग्रा ही दोन जोडगावे हा सण एकत्र येऊन करतात. भूमियाल देवता ह्या स्थानिक संरक्षक देवता मानतात. ह्यात अनेक क्लिष्ट स्वरूपाचे विधी केले जातात.
रामायणावर किंवा रामावर आधारित कथा, कृष्णावर आधारित कथा सादर केल्या जातात. ह्याशिवाय महाभारतावर आणि पांडवांवर आधारित कथांचा ह्यात समावेश होतो. ह्यात घढवाली आणि गोरख्यांच्या लढाईचेही प्रसंग सादर केले जातात. काही सामाजिक जनजीवनातील प्रसंगही लोकांच्या समोर सादर करतात.
जवळजवळ 192 कुटुंब हा सण साजरा करायला एकत्र येतात. ह्यात 18 चरित्र, त्यांना लागणारे 18 मुखवटे आणि 18 पुराणांचे समारंभपूर्वक प्रशंसा असा एकूण प्रकार असतो.
ह्यातील मुखवटे हे अत्यंत पवित्र मानले जातात आणि त्यांचा यथोचित पूजा करून फक्त सादरकरत्याला घालता येतात. ह्या उत्सवाची आखणी आणि तयारी गावकरी करतात. गावातील प्रत्येक जातीच्या व्यक्तीला एक विशिष्ट्य काम नेमून दिलेलं असते, जसे गावातील वृद्ध आणि लहान मुलं हे सादरीकरण करणार. ब्राम्हण पूजाविधी आणि इतर धार्मिक क्रियांचे संचालन करणार.
ह्या गावातील भंडारी जातीच्या क्षत्रियांना मनाचे स्थान आहे. त्यांना नरसिंहांचा पवित्र मुखवटा घालण्याचा मान असतो. नरसिंह म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पशु.
रम्मन हा सण म्हणजे नाट्य, संगीत, ऐतिहासिक घडामोडी, पारंपारिक लिखित आणि अलिखित काव्य आणि कथा ह्यांचा एकत्रित उत्सव. विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन हे तिथल्या निसर्गाच्या सानिध्यात तर होतेच शिवाय तिथले समाज जीवन, धार्मिक-सांस्कृतिक रीतीरिवाज, मिथक ही रम्मन सारख्या सणातून व्यक्त होतात.
रम्मनच्या विविधते मुळेच 2009 साली ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात नवरोझ ह्या पारशी सणाविषयी जाणून घेऊ.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
छान माहिती..अशीच माहिती देत रहा
धन्यवाद माधुरी, बोधसूत्रचा वाचकवर्ग आणि तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत होवो..!!