वारसा

Home \ वारसा
Jun 01

गंगावतरण – हर गंगे भागीरथी

गंगा अवतरणाला कारणीभूत होता भगीरथ. या भगीरथाने त्याच्या घोर तपोबलाने देवी गंगेला पृथ्वीवर आणले. एकार्थी ती भगीरथाची कन्या झाल्याने गंगेला भागीरथी हे नाव गंगेला प्राप्त झाले. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याचा प्रसंग वेगवगेळ्या कथा भागांतून आपल्या समोर येतो. महाभारतातील वनपर्वात गंगा अवतरणाची कथा येते. गंगा प्रत्यक्ष भूतलावर येणे हा दिव्य अनुभूति देणारा एक सोहळा म्हणता येईल. […]
Apr 02

श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर आणि कथाशिल्प

पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य या क्षेत्रावर पसरलेले होते. विजयनगर साम्राज्यातील राज्यांनी त्यांचे आधिपत्य स्थापन करून या संपूर्ण नगरीची पुनर्रचना केली होती हे, सध्या इथे असणाऱ्या […]
Jan 14

तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व

पौष महिना सुरु झाला की लगबग सुरु होते ती मकर संक्रांतीची. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत नात्यांमध्ये माधुर्य वाढवणारा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आत्ता जरी मकर संक्रांतीचे स्वरूप हे सणाचे असले, तरी हे भारतीय धार्मिक व्रतांपैकी एक व्रत होते. सध्या आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा […]
Jul 03

मुंबईचा वारसा – व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको

बहरीनमधील मनामा येथे 30 जून 2018 रोजी संपन्न झालेल्या 42 व्या सत्रात, मुंबईचा सांस्कृतिक वारसा म्हणून मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जवळजवळ 94 इमारती आणि 1500 पृष्ठसंख्या असलेले तीन भागांमधील दस्ताऐवज या सत्रात सादर केले गेले. या इमारतींच्या स्थापत्य शैलींंची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली […]
May 05

वारसा दत्तक योजना – स्मारक मित्र की वैरी

13 एप्रिल 2018 रोजी जाहीर झालेल्या लाल किल्ला दत्तक योजनेवर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियामध्ये वाचायला मिळाल्या. त्यामध्ये बऱ्यापैकी अनेक लोकांचा नावडतीचा सूर होता. त्यात अनेक प्रतिक्रिया वारसा दत्तक योजना म्हणजे काय आहे हे माहित नसताना आलेल्या दिसत होत्या. राष्ट्रीय पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने एकत्र येऊन वारसा दत्तक योजना (अपनी धरोहर, अपनी पेहचान […]
Nov 25

लहान मुलं आणि वारसा

आपली संस्कृती आपला वारसा ह्या लेख मालिकेच्या पहिल्याच भागात आपण पाहिलं होतं की वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट, परंपरा, वस्तू किंवा वास्तू. हा वारसा भविष्यात आपण आपल्या भावी पिढीला सुपूर्त करणार असतो. पण हा वारसा आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये देताना, आपण किंवा आपल्या पूर्वजांनी इतके वर्ष हा वारसा का जपला? […]
Nov 23

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 3)

आपला वारसा आपली संस्कृती भाग 1 मध्ये वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आपला वारसा आपली संस्कृती भाग 2 मध्ये पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष, लेणी आणि संग्रहालये ह्या वारसा घटकांची माहिती करून घेतली. आज तश्याच काही वेगळ्या मुद्दांवर आपण नजर टाकूया. ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष यांचा विचार केला […]
Nov 20

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

वारसा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आपला वारसा आपली संस्कृती या लेखाच्या कालच्या भागात बघितले. आज आपण प्रत्यक्ष वारसा आणि त्याच्याशी निगडीत इतर घटकांची माहिती बघणार आहोत. या घटकांची, स्थळांची काही परिचित- अपरिचित वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तो वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपली कर्तव्ये आणि जबाबदारी काय आहे, हे बघणार आहोत. छोट्या-छोट्या गोष्टीही वारसा […]
Nov 19

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे […]
Oct 20

दीदारगंज यक्षी

20 ऑक्टोबर 1917 रोजी, म्हणजे आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. बिहारमधील एका पोलीस निरीक्षकाने एका मूर्तीची गुप्तपणे नोंद केली होती. ह्या पोलिस रिपोर्ट प्रमाणे, जुन्या पटना शहरातील दीदारगंज परिसरात, गंगेच्या किनारी एक धोबी, जमिनीत फसलेल्या एका दगडाच्या स्लॅबवर कपडे धुवत असे. एक दिवस काठावर कपडे धुवत असताना, त्याच्या जवळून एक साप पाण्यात त्या […]