शिल्पसूत्र

Home \ शिल्पसूत्र
Feb 05

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति

आज वसंतपंचमी, मकर संक्रमणानंतर माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी. वसंतपंचमीला वसन्त ऋतूचे पहिले पाऊल पडते आणि निसर्ग आपली कूस बदलतो. निसर्गाच्या बदलत्या रूपात वसन्त ऋतू वेगवेगळे रंग भरायला सुरुवात करतो. प्राचीन भारतीय परंपरेत या निसर्गोत्सवा सोबतच मदनोत्सव, श्रीपंचमी आणि ज्ञानपंचमी म्हणून हा दिवस साजरा केला जात असे. आजही उत्तर-पूर्व भारतात वसंतपंचमीला सरस्वती पूजन करून विद्यारंभ […]
Jun 01

गंगावतरण – हर गंगे भागीरथी

गंगा अवतरणाला कारणीभूत होता भगीरथ. या भगीरथाने त्याच्या घोर तपोबलाने देवी गंगेला पृथ्वीवर आणले. एकार्थी ती भगीरथाची कन्या झाल्याने गंगेला भागीरथी हे नाव गंगेला प्राप्त झाले. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याचा प्रसंग वेगवगेळ्या कथा भागांतून आपल्या समोर येतो. महाभारतातील वनपर्वात गंगा अवतरणाची कथा येते. गंगा प्रत्यक्ष भूतलावर येणे हा दिव्य अनुभूति देणारा एक सोहळा म्हणता येईल. […]
Apr 02

श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर आणि कथाशिल्प

पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य या क्षेत्रावर पसरलेले होते. विजयनगर साम्राज्यातील राज्यांनी त्यांचे आधिपत्य स्थापन करून या संपूर्ण नगरीची पुनर्रचना केली होती हे, सध्या इथे असणाऱ्या […]
Oct 18

नवरस आणि देवी शिल्पे : एक अनुभव

त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनम्  त्रैलोक्यातील समस्त भावांचे प्रस्तुतीकरण किंवा अनुकीर्तन म्हणजे नाट्य. भरतमुनींच्या रससिद्धांतानुसार नाट्य म्हणजेच काव्य. या सूत्रामधून खरंतर या लेखमालेचा जन्म झाला, असे म्हणता येईल.शिल्पकलेचा अभ्यास करताना मला कायम असे वाटते, शिल्प म्हणजे खरेतर काव्यच आहे. शब्दरूपा पेक्षा साक्षात साकार रूपातील एक काव्य. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर जेव्हा परमोच्च भाव प्रकट होतो, […]
Oct 16

शांत रस – सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमुनींच्या मते सर्व रसांची परिणीती […]
Oct 15

अद्भुत रस – अर्धनारीश्वर : नवरस आणि देवी शिल्पे

दिव्यश्चानन्दजश्चैव द्विधा ख्यातोऽद्भुतो रसः | रससिद्धांतामधील शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक आणि बीभत्स यानंतर येतो तो रस म्हणजे अद्भुत रस. भरतमुनींचे नाट्यशास्त्र अद्भुत रसाचे दोन भेद स्पष्ट करते. अद्भुत रसाचा पहिला भेद म्हणजे दिव्यअद्भुत, ज्यामध्ये दिव्यत्त्वाची प्रचीती येते. अद्भुत रसाचा दुसरा भेद म्हणजे आनन्दज अद्भुत, ज्यामध्ये या प्रकारच्या रस निष्पत्तीने आनंदाची अनुभूती येते. अमरकोशात […]
Oct 14

बीभत्स रस – चामुण्डा : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत आत्तापर्यंत शृंगार रस, हास्य रस, करूण रस, रौद्र रस, वीर रस आणि भयानक रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार आहोत. देवी विग्रहातून व्यक्त होणाऱ्या नवरसांमधील आणखीन एक रस म्हणजे बीभत्स रस. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये बीभत्स या रसाचे दोन भेद सांगितले आहेत. […]
Oct 07

भयानक रस – करालवदना : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस शृंगार जो उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून आपण अनुभवला. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये हास्य रस बघितला. देवीच्या त्रिपुरा या रूपातून करूण रसाची अनुभूती घेतली. क्रोधाने रौद्र रूप धारण केलेल्या कालीचे स्वरूप बघितले. महिषासुरमर्दिनीच्या रूपात वीर रसातील उत्साह अनुभवला. या लेखामध्ये देवीच्या काली स्वरूपातील दुसऱ्या शिल्पातून व्यक्त […]
Oct 06

वीर रस – महिषासुरमर्दिनी : नवरस आणि देवी शिल्पे

बलपराक्रमशक्तीप्रतापप्रभावादीभिर्विभावैरुत्पद्यते बल, पराक्रम, शक्ती, प्रताप आणि प्रभाव या विभावांमुळे ज्या रसाचा उद्भव होतो, तो म्हणजे वीर रस. उत्साह हा वीर रसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे याला सात्विकता लाभली आहे. दया-वीर, दान-वीर, धर्म-वीर आणि युद्ध-वीर असे वीर रसातील विविध भाव व्यक्त होतात. याशिवाय असुर वीर आणि लोभ वीर या संकल्पनाही वीर रसाशी निगडीत आहेत. अर्थात देवीचे युद्ध […]
Oct 05

रौद्र रस – काली : नवरस आणि देवी शिल्पे

रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये रौद्र रसाची कर्मे म्हणजे या रसामुळे काय काय होते हे पुढील श्लोकातून व्यक्त करतात –  ताडनपाटनपीडनच्छेदनप्रहरणशस्त्र – सम्पातसम्प्रहाररुधिराकर्षणाद्यानि […]