बोधसूत्र | BodhSutra Blog
बनावटिकरण किंवा खोटेपणा हा आपल्याला आज प्रत्येक गोष्टीमधे पहावयास मिळतो आणि चलनही त्याला अपवाद नाही. चलन नवे असो किंवा जुने त्याचे बनावटिकरण होतेच. आज आपण वापरत असलेल्या नाण्यांचे, नोटांचे देखील बनावटीकरण होते. त्याचे हेतु...
पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य...
त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनम् त्रैलोक्यातील समस्त भावांचे प्रस्तुतीकरण किंवा अनुकीर्तन म्हणजे नाट्य. भरतमुनींच्या रससिद्धांतानुसार नाट्य म्हणजेच काव्य. या सूत्रामधून खरंतर या लेखमालेचा जन्म झाला, असे म्हणता येईल.शिल्पकलेचा अभ्यास करताना मला कायम असे वाटते, शिल्प...
नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण...
दिव्यश्चानन्दजश्चैव द्विधा ख्यातोऽद्भुतो रसः | रससिद्धांतामधील शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक आणि बीभत्स यानंतर येतो तो रस म्हणजे अद्भुत रस. भरतमुनींचे नाट्यशास्त्र अद्भुत रसाचे दोन भेद स्पष्ट करते. अद्भुत रसाचा पहिला भेद म्हणजे...
नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत आत्तापर्यंत शृंगार रस, हास्य रस, करूण रस, रौद्र रस, वीर रस आणि भयानक रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार...
नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस शृंगार जो उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून आपण अनुभवला. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये हास्य रस बघितला. देवीच्या त्रिपुरा या रूपातून करूण रसाची अनुभूती घेतली. क्रोधाने...
बलपराक्रमशक्तीप्रतापप्रभावादीभिर्विभावैरुत्पद्यते बल, पराक्रम, शक्ती, प्रताप आणि प्रभाव या विभावांमुळे ज्या रसाचा उद्भव होतो, तो म्हणजे वीर रस. उत्साह हा वीर रसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे याला सात्विकता लाभली आहे. दया-वीर, दान-वीर, धर्म-वीर आणि युद्ध-वीर असे...
रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना...
नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत आत्तापर्यंत आपण, उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून शृंगार रस आणि मागच्या लेखातून सप्तमातृका पटातील हास्य रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्प आणि करुण रस याची माहिती घेऊया. ...