बोधसूत्र | BodhSutra Blog
1882-83 साल. एक फ्रेंच अभ्यासक जो कम्बुज म्हणजे सध्याच्या कंबोडिया प्रांतामध्ये काही संशोधनार्थ गेला होता. फुनान मधील ताकेओ (Takeo) प्रांतातील नोम-दा (Phnom Da) या मंदिरातून एका देवता मूर्तीचे शीर्ष तो फ्रान्सला सोबत घेऊन गेला. फ्रान्समधील...
ऋग्वेद काळापासून शिव देवतेच्या संकल्पनेच्या विकासातील रुद्राचे दैवतशास्त्रीय स्वरूप, शिवाय नमः या लेख शृंखलेचा पहिला भाग रुद्राय नमः मध्ये बघितले. दुसऱ्या भागात, याच रुद्राने त्रिपुरांचा विनाश करणारा त्रिपुरान्तकाय नमः हा लेख आपण बघितला. आज शिवाचे, उमेसोबत परिवार देवतेत होणारे...
प्राचीन संहिता, पुराणकथा आणि त्यामध्ये गुंफलेल्या काही संकल्पना या मूर्त रुपाला जन्म देत असतात. रुद्र या संकल्पनाचा विस्तार रुद्राय नमः या मागच्या लेखामध्ये आपण बघितला आहे. हाच रुद्र हातामध्ये धनुष्य धारण करून रथात आरूढ...
आज सोमवार, श्रावणमास आरंभ होतोय. बोधसूत्र वाचकांसाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतील हा पहिला लेख घेऊन आले आहे. देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये...
भारताच्या वायव्येकडे स्थित, एक प्रांत म्हणजे गांधार. या प्रांतात बहरलेली कला गांधार कला या नावाने ओळखली जाते. ही कला, म्हणजे पूर्वेकडील भारत आणि पश्चिमेकडील ग्रीक, रोम, इराण आणि शक कलांची सांस्कृतिक समन्वितता आहे. भारताच्यादृष्टीने गांधार...
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्रदेशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा || राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा || राकट, रांगडा असलेल्या, कणखर असलेल्या या महाराष्ट्र...
पंजाब, भारतातील उत्तर पश्चिमी भाग हा तिथल्या मेहनती लोकांसाठी आणि तिथल्या दमदार संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अमृतसर जवळील जन्दियाला गुरु, पंजाब इथे एक विलक्षण संस्कृती बघायला मिळते जी फाळणीनंतरच्या स्थलांतराचा परिणाम आहे. जन्दियाला गुरु ह्या...
सत् युगामध्ये विष्णूच्या ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञीय समर्पणाने, द्वापार युगामध्ये भगवंताच्या चरण सेवेने जे फळ प्राप्त होईल तेच कलीयुगामध्ये केवळ संकीर्तनाने साध्य होईल, हे मानणारी परंपरा म्हणजे मणिपुरमधील संकीर्तन. इ.स. 15 शतकात मणिपूरचा राजा...
बौद्ध धर्मशाळा आणि लडाख मधील गावात बौद्ध लामा किंवा धर्मगुरू, त्यांच्या पवित्र मंत्राचे पठाण करतात. हे पवित्र मंत्र त्यांचे तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण सांगणे आहे. लडाखमध्ये महायान आणि वज्रयान ह्या पंथाची उपासना चालते. त्यापैकी चार...
पूर्व भारतातील एक नृत्य प्रकार म्हणजे छउ. छउ ह्या नृत्यामध्ये महाभारत आणि रामायण किंवा कधीकधी स्थानिक लोकांच्या कथा सादर केल्या जातात. छउ ह्याचा संस्कृत शब्द होतो, छाया म्हणजे सावली किंवा छावणी. ही नृत्यशैली वडील आपल्या...