Devi

Home \
Oct 14

बीभत्स रस – चामुण्डा : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत आत्तापर्यंत शृंगार रस, हास्य रस, करूण रस, रौद्र रस, वीर रस आणि भयानक रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार आहोत. देवी विग्रहातून व्यक्त होणाऱ्या नवरसांमधील आणखीन एक रस म्हणजे बीभत्स रस. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये बीभत्स या रसाचे दोन भेद सांगितले आहेत. […]
Oct 07

भयानक रस – करालवदना : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस शृंगार जो उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून आपण अनुभवला. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये हास्य रस बघितला. देवीच्या त्रिपुरा या रूपातून करूण रसाची अनुभूती घेतली. क्रोधाने रौद्र रूप धारण केलेल्या कालीचे स्वरूप बघितले. महिषासुरमर्दिनीच्या रूपात वीर रसातील उत्साह अनुभवला. या लेखामध्ये देवीच्या काली स्वरूपातील दुसऱ्या शिल्पातून व्यक्त […]
Oct 06

वीर रस – महिषासुरमर्दिनी : नवरस आणि देवी शिल्पे

बलपराक्रमशक्तीप्रतापप्रभावादीभिर्विभावैरुत्पद्यते बल, पराक्रम, शक्ती, प्रताप आणि प्रभाव या विभावांमुळे ज्या रसाचा उद्भव होतो, तो म्हणजे वीर रस. उत्साह हा वीर रसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे याला सात्विकता लाभली आहे. दया-वीर, दान-वीर, धर्म-वीर आणि युद्ध-वीर असे वीर रसातील विविध भाव व्यक्त होतात. याशिवाय असुर वीर आणि लोभ वीर या संकल्पनाही वीर रसाशी निगडीत आहेत. अर्थात देवीचे युद्ध […]
Oct 05

रौद्र रस – काली : नवरस आणि देवी शिल्पे

रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये रौद्र रसाची कर्मे म्हणजे या रसामुळे काय काय होते हे पुढील श्लोकातून व्यक्त करतात –  ताडनपाटनपीडनच्छेदनप्रहरणशस्त्र – सम्पातसम्प्रहाररुधिराकर्षणाद्यानि […]
Oct 03

करुण रस – त्रिपुरा : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत आत्तापर्यंत आपण, उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून शृंगार रस आणि मागच्या लेखातून सप्तमातृका पटातील हास्य रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्प आणि करुण रस याची माहिती घेऊया.  करुण रसाचा स्थायीभाव शोक आहे. नाट्यशास्त्रामध्ये या रसाची व्याख्या करताना शाप, क्लेश, पतन, वियोग, हानी, मृत्य अश्या विभावांमुळे करुण रस उत्पत्ती […]
Oct 02

हास्य रस – सप्तमातृका : नवरस आणि देवी शिल्पे

मागच्या भागात उमा महेश्वर यांच्या आलिंगन मूर्तीमधून आपण शृंगार रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्पातील हास्य रसयुक्त अभिव्यक्ती बघूया.  रससिद्धांतामध्ये, हास हा स्थायीभाव असेलला दुसरा रस म्हणजे हास्य रस. यामध्ये वेशभूषा , केशरचना, अलंकार यांच्यामधील विकृती म्हणजे जे असायला हवे त्याच्या विपरीत असेल तर त्यातून हास्य निर्मिती होते. त्यामुळे हास्य रसाचे विभाव हे […]
Oct 01

शृंगार रस – उमामहेश्वर आलिंगन मूर्ती : नवरस आणि देवी शिल्पे

पार्वती म्हणजे प्राकृतिक शक्ती आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम आणि शिव म्हणजे सत्य. देवीच्या विविध रूपांपैकी पार्वती हे स्वरूप सौंदर्य, माधुर्य आणि अनुराग यांची साक्ष देणारे आहे. त्यामुळेच उमा महेश्वर हे दम्पती प्राचीन भारतीय काव्य, नाट्य, नृत्य, चित्र आणि शिल्प परंपरेचा अत्यंत प्रिय विषय झाले. महाकवी कालिदासरचित कुमारसंभव हे काव्य पार्वती-परमेश्वर यांना समर्पित आहे, ज्यामध्ये […]
Sep 29

नवरस आणि देवी शिल्पे

महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः |महामोहा च भवती महादेवी महासुरी || देवी स्वरूपा म्हणजे तिच्यातील विविध तत्त्वांचे साक्षात दर्शन आपल्याला घडते. कधी ती निसर्ग रूपात अवतरणारी प्रकृतीरूपा असते तर कधी ती असुरांचे निर्दालन करणारी दुर्गा असते. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृति, महामोहा अश्या विविध रूपांमध्ये तिची कल्पना केली आहे. भारतीय शिल्पकलेमध्ये देवीच्या सौम्य, रौद्र, उग्र, भयानक अश्या […]