ellora

Home \
Aug 30

दशावतार लेणीतील नटराज

वेरूळ मधील लेणी क्र.15 म्हणजे दशावतार लेणी. पहिला मजल्यावर चढून गेलो की शिल्पांनी संपन्न असा एक भव्य सभामंडप दृष्टीस पडतो. या लेणीमध्ये दक्षिण दिशेला ओळीने विष्णूच्या विविध अवतार शिल्पित केले आहेत. याच सभामंडपाच्या उत्तर दिशेला शिवाचे विविध विग्रह दिसतात. त्यापैकी दुसरा शिल्पपट हा नृत्यरत शिवाचे नर्तन दाखवणारा आहे.  नटराजाचे शिल्प काही अंशी हे क्षतिग्रस्त आहे. […]
Aug 27

कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज

ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा, कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे. त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे […]
Mar 08

द्वादश ज्योतिर्लिंग

भारतामध्ये भगवान शिवाला समर्पित अनेक शैवक्षेत्र आसेतुहिमाचल पसलेली आहेत. परंतु भारतीय परंपरेत या शैव क्षेत्रांमध्ये द्वादश ज्योतिर्लिंग ही विशेष महत्त्वाची आहेत. शिवाय परंपरेने या स्थानांना तीर्थक्षेत्राचे महत्त्व लाभलेले आहे. त्यामुळे या द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा भाविक पुण्यार्जनासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी करतात. या बारा ज्योतिर्लिंगांच्या समूहामध्ये अनेक साधर्म्य आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी बहुतांश ही अनादितीर्थे म्हणता येतील. म्हणजेच ज्योतिर्लिंग […]