indian culture

Home \
May 29

वैभवशाली उस्मानाबाद

देशासह जगातील इतिहास पाहता आपल्याला काही प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या दिसतात. त्यात इजिप्त, रोम, भारत, युरोप इत्यादी देश प्रामुख्याने आहेत. त्यात भारतामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन अशी विकसीत व पुढारलेली सिंधू संस्कृती नांदत होती हे उत्खननातून सप्रमाण सिद्ध झाले आहे. या संस्कृतीची ठिकाणे ही आजच्या पाकिस्तानमधील मोहोंजोदाडो व भारतातील राखीगढी, लोथल (गुजरात) इत्यादी भागात असून […]
Mar 08

कऱ्हाडकन्या – अभिनव सरस्वती चन्द्रलेखा

कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या प्रीतिसंगमावर वसलेले गावं म्हणजे कऱ्हाड. सध्या कऱ्हाड किंवा कराड या नावाने परिचित हे गावं, प्राचीन करहाट किंवा करहाटक या नावाने ओळखले जात होते. ही कऱ्हाडकन्या अभिनव सरस्वती चन्द्रलेखा, शिलाहार राजवंशातील राजकन्या म्हणजे साक्षात कला, ज्ञान आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम होती. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात शिलाहार राजवंशाची एक शाखा ही […]
Mar 04

श्री क्षेत्र औंढा नागनाथ

श्री क्षेत्र औंढा नागनाथ (GPS 19°32’13.5″N, 77°02’29″E) म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शैव क्षेत्र.  गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्हात, श्री क्षेत्र औंढा येथे भव्य आणि मंत्रमुग्ध करणारे शिल्पसमृद्ध नागनाथ शिवालय आपल्याला बघायला मिळते. समुद्रसपाटीपासून साधारण 464 मीटर उंचीवर नागनाथाचे हे मंदिर आहे. औंढा हे गावं मराठवाड्यातील परभणीच्या नैऋत्येस 36 कि.मी. अंतरावर कळमनुरी या तालुक्यात […]
Jan 14

तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व

पौष महिना सुरु झाला की लगबग सुरु होते ती मकर संक्रांतीची. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत नात्यांमध्ये माधुर्य वाढवणारा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आत्ता जरी मकर संक्रांतीचे स्वरूप हे सणाचे असले, तरी हे भारतीय धार्मिक व्रतांपैकी एक व्रत होते. सध्या आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा […]
Nov 19

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे […]
Jan 06

आपली संस्कृती

कोणी आपल्याला आपला परिचय विचारला की आपण स्वतःचा परिचय यथायोग्य करून देतो. पण खरचं आपल्या स्वतःची ओळख आपल्याला स्वतःला पटली आहे का? असा प्रश्न किती लोकांच्या मनात डोकावतो? स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर आधी आपल्या संस्कृतीची ओळख होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून म्हणजे सुमारे हजारो वर्षांपासून अविरत प्रवाहित होत आलेली संस्कृती आहे. […]