indian heritage

Home \
Aug 30

दशावतार लेणीतील नटराज

वेरूळ मधील लेणी क्र.15 म्हणजे दशावतार लेणी. पहिला मजल्यावर चढून गेलो की शिल्पांनी संपन्न असा एक भव्य सभामंडप दृष्टीस पडतो. या लेणीमध्ये दक्षिण दिशेला ओळीने विष्णूच्या विविध अवतार शिल्पित केले आहेत. याच सभामंडपाच्या उत्तर दिशेला शिवाचे विविध विग्रह दिसतात. त्यापैकी दुसरा शिल्पपट हा नृत्यरत शिवाचे नर्तन दाखवणारा आहे.  नटराजाचे शिल्प काही अंशी हे क्षतिग्रस्त आहे. […]
Aug 29

चित्रातून अभिव्यक्त होणारे नटराज स्वरूप

मानवासाठी चित्रकला हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्राथमिक साधन होते. हे आपल्याला प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास बघताना समजते. अगदी प्राचीन काळापासून मानव जेव्हा गुहांमध्ये राहत होता त्यावेळी चित्र या माध्यमाचा त्याने यथायोग्य वापर केलेला दिसतो. भारतीय उपखंडाबद्दल विचार केला तर प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास हा आपल्याला भीमबेटका येथील मानवनिर्मित शैलाश्रयांमध्ये झालेला दिसतो.  परंतु ज्याप्रमाणे काळाच्या ओघात वास्तूशास्त्र, […]
Aug 28

मकर तोरणावरील नृत्यरत शिव

मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील […]
Aug 26

औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज

महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा मला नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार आहोत. मंदिराच्या खालाच्या म्हणजे […]
Aug 24

ऊर्ध्वरेता नटराज

छत्तीसगढ राज्याची जीवनधारा इथे महानदीच्या रूपाने वाहते. या महानदीच्या काठावर सिरपुर येथील गन्धेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवाची ही अष्टभुज नटराज प्रतिमा आहे. गन्धेश्वर महादेव मंदिरात शिवाचे विविध विग्रह, महिषासुरमर्दिनी आणि काही जैन, बौद्ध प्रतिमांचे अवशेष आहेत. या मंदिराचा काळ साधारण 5 वे शतक मानला जातो. या मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या अष्टभुज नटराजाची अत्यंत विशेष अशी ही प्रतिमा […]
Aug 21

भुजंगत्रसितम्

नटराज शिल्पांमध्ये भुजंगत्रसितम् करण हे अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाचे करण आहे. या करणात पदन्यास करणारी शिवाची असंख्य सुंदर शिल्पे किंवा धातु प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. ‘भुजंगत्रसित’ या करणामध्ये पायाजवळ भुजंग आल्याच्या कल्पनेने लगबगीने पाय कुञ्चित अवस्थेत उचला जातो. चोल शैलीमधील नृत्यरत शिव हा भुजंगत्रसित करण करताना शिल्पित केला आहे. परंतु आगम काळामध्ये याच करणाला आनंद […]
Aug 20

शुकनासिकेतील नटराज

मंदिर स्थापत्यातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी घटक म्हणजे शुकनास. मंदिराच्या छाद्य भागावर शिखर सुरु होते. या शिखरावर शुकनासिका किंवा महाशुकनासिकेची रचना केलेली असते. ‘शुक’ म्हणजे पोपट आणि ‘नासिका’ म्हणजे नाक त्यामुळे या स्थापत्य घटकाचा आकार हा पोपटाच्या नाकाप्रमाणे असल्याने याला शुकनास असे म्हणतात. या शुकनासिकांमध्ये विविध देवी- देवता किंवा क्वचित सिद्धांची शिल्पे असतात. त्यापैकी नटराज […]
Aug 19

कांस्य (ब्राँझ) नटराज प्रतिमा

भारतीय कला इतिहासात धातु प्रतिमांची एक उज्ज्वल परंपरा कायमच गौरवलेली आहे. यामध्येही विशेष करून चोल यांच्या कांस्य प्रतिमा या विशेष लोकप्रिय झाल्या. चोलांप्रमाणेच पल्लवांच्याही कांस्य किंवा धातु प्रतिमा बघायला मिळतात. कांस्य हा तांबे आणि कथिल या धातूंच्या मिश्रणातून तयार होणारा धातु आहे. त्यामुळे दोनही धातु हाताळताना कलाकाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि पारंपारिक कौशल्य यांची पराकाष्ठा या […]
Aug 17

मल्लिकार्जुन मंदिरावरील नटराज

पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर नटराज प्रतिमा बघायला मिळते. अतिशय रेखीव अशी प्रसन्न चर्या असलेली नटराज प्रतिमा आपल्याला मंदिराच्या बाह्यभिंतीवर एका कोनाड्यात शिल्पित केलेली दिसते. शिव […]
May 29

वैभवशाली उस्मानाबाद

देशासह जगातील इतिहास पाहता आपल्याला काही प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या दिसतात. त्यात इजिप्त, रोम, भारत, युरोप इत्यादी देश प्रामुख्याने आहेत. त्यात भारतामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन अशी विकसीत व पुढारलेली सिंधू संस्कृती नांदत होती हे उत्खननातून सप्रमाण सिद्ध झाले आहे. या संस्कृतीची ठिकाणे ही आजच्या पाकिस्तानमधील मोहोंजोदाडो व भारतातील राखीगढी, लोथल (गुजरात) इत्यादी भागात असून […]