Natesha

Home \
Aug 28

मकर तोरणावरील नृत्यरत शिव

मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील […]
Aug 27

कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज

ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा, कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे. त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे […]
Aug 08

वृषभ ताण्डव नटराज प्रतिमा

पाल- सेन शैली म्हणून कीर्ती पावलेल्या शिल्पशैलीतील विलक्षण सुंदर नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. बंगाल, बिहार आणि बांग्लादेश या प्रांतामध्ये या पाल शैलीतील अनेक शिल्पं बघायला मिळतात. या शैलीमध्ये शिल्पांमधील नाजूकपणा आणि सहजता दिसते. विशिष्ट पद्धतीचे गोल चेहरे, बारीक डोळे ही या शैलीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. नटराजाचे एक भिन्न स्वरूप या प्रतिमांमधून अभिव्यक्त होते. पाल […]
Aug 07

ललाटबिम्बावरील नटराज

देवालयात प्रवेश घेताना विविध शाखांनीयुक्त अशी अलंकृत द्वारे आणि त्यांचे विशिष्ट ललाटबिम्ब आपले लक्ष वेधून घेतात. ललाटबिम्ब म्हणजे या द्वारांच्या ललाटपट्टीवर मध्यभागी असलेले देवतेची प्रतिमा. या ललाटबिम्बावर गरुडारूढ विष्णू, उमामहेश्वर, गजलक्ष्मी, गणेश अश्या विविध देवतांच्या प्रतिमा असतात. परंतु पट्टदकल येथील  गलगनाथ मंदिराच्या ललाटबिम्बावर नृत्यरत शिवाचे नटराज स्वरूपातील शिल्पांकन दिसते. ऐहोळे पासून जवळच असलेले पट्टदकल येथील […]
Aug 06

मातृकांसह नृत्यरत शिव

ताण्डवप्रिय शिवाच्या एकशे आठ करणांचा उल्लेख भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात येतो. तामिळनाडू येथील चिदंबरम्, तंजावूर येथील बृहदिश्वर, कुम्भकोणम् येथील सारंगपाणी मंदिर आणि सातारा येथील नटराज मंदिर येथे या करणांची शिल्पांमधील अभिव्यक्ती बघायला मिळते. भरतमुनी करण लक्षण सांगताना म्हणतात –  हस्तपादसमायोगो नृत्यस्य करणं भवेत् म्हणजे हस्त आणि पदन्यास यांचे एकत्रित संचलन म्हणजे करण. प्रत्येक करणाचे स्वतःचे असे […]
Aug 05

CERN आणि नटराज

विश्वाच्या उत्पत्ती विषयी असलेले कुतूहल अगदी प्राचीन काळापासून मानवाला आहेच. शुद्ध विज्ञानाधीष्टीत आणि तर्कशुद्ध बुद्धीने मानवाने विश्वोत्पत्तिचे महास्फोट (Big Bang Theory) सिद्धान्त, स्थिर स्थिती (Steady State Theory) यांसारखे विविध सिद्धान्त जगासमोर वेळोवेळी मांडले आहेत. संस्कृतीच्या कवडस्यातून बघितले तर जगातील सर्वच संस्कृतींमध्ये विश्व निर्मितीला धरून विविध मिथकांचाही जन्म झालेला आहे, असे दिसते. भारतीय परंपरेत दार्शनिक आणि […]