केरळ राज्यातील कलाडी या गावामध्ये श्री शंकराचार्य यांचा शिवगुरू आणि आर्याम्बा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी जन्म झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी श्री शंकराचार्य यांनी चतुर्वेद आणि शास्त्रग्रंथांचे अध्ययन पूर्ण केले. आपल्या मातेची अनुज्ञा घेऊन सद्गुरूच्या शोधात निघाले. नर्मदा तटावरील ओंकारेश्वराला श्री शंकराचार्य येऊन पोहोचले. त्यावेळी भगवत्पूज्यपाद गोविंदयती हे एका गुहेमध्ये साधना करीत होते. श्री शंकराचार्य जेव्हा त्या गुहेत आले त्यावेळी गोविंदयती यांनी शंकराचार्य यांना विचारले ‘तु कोण आहेस?’ अवघ्या आठ वर्षाच्या त्या बालकाने या प्रश्नाचे उत्तर सलग सहा श्लोकांनी बद्ध अश्या आत्मषट्कम् स्तोत्राने दिले.अद्वैत तत्वज्ञानाच्या अमृत बिंदूंचा वर्षाव या सहा श्लोकांमधून झाला. हे स्तोत्र निर्वाणषट्कम् म्हणून ही सुपरिचित आहे. साधकाला आत्मसाक्षात्काराच्या चिंतनाकडे नेणारा मार्ग प्रशस्त करणारे स्तोत्र म्हणजे हे निर्वाणषट्कम्.
निर्वाणषट्कम्मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
साधकांच्या हृदयात आत्मभानाची ज्योत जागृत करणाऱ्या श्रीमद् आद्य शंकराचार्य विभूतींच्या पुण्यस्मृतींना विनम्र नमन.