Author: Dhanalaxmi

Home \
Oct 20

दीदारगंज यक्षी

20 ऑक्टोबर 1917 रोजी, म्हणजे आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. बिहारमधील एका पोलीस निरीक्षकाने एका मूर्तीची गुप्तपणे नोंद केली होती. ह्या पोलिस रिपोर्ट प्रमाणे, जुन्या पटना शहरातील दीदारगंज परिसरात, गंगेच्या किनारी एक धोबी, जमिनीत फसलेल्या एका दगडाच्या स्लॅबवर कपडे धुवत असे. एक दिवस काठावर कपडे धुवत असताना, त्याच्या जवळून एक साप पाण्यात त्या […]
Sep 13

वेदोऽखिलो धर्ममूलम्

भारतीय परंपरेचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती आणि या वैदिक संस्कृतीने आपल्याला दिलेले वैदिक वाङ्मय. वैदिक परंपरा ही भारतीयांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता आणि आजही आहे. म्हणूनच ही वेद पठण परंपरा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदवली गेली आहे. या वेद परंपरेतून लाभलेले वाङ्मय म्हणजे अलौकिक ज्ञानाची अमुल्य रत्न, गर्भात धारण केलेला […]
Aug 22

लोकसाहित्य आणि भारतीय विद्या

आज जशी तंत्रज्ञान युगाने लहान मुलांच्या हातामध्ये अनेक Digitized खेळणी दिली आहेत तशी खेळणी मी लहान असताना माझ्याकडे नव्हती. किंबहुना माझ्या वयाच्या कुणाकडेच नव्हती. आमच्या घरासमोर एक आजी रहायच्या. पटवर्धन आजी. दररोज संध्याकाळी त्या त्यांच्या बाल्कनीमध्ये खुर्चीवर बसून रस्त्यावरची वर्दळ बघत चहा घ्यायच्या. पटवर्धन आजींंचा अजून एक विरंगुळा होता, तो म्हणजे माझ्यासारख्या लहान मुलांना त्या रोज […]
Aug 21

शिवाय नमः – एक अनुभव

प्रत्येक अनुभव हा आपल्याला समृद्ध करत असतो. शिवाय नमः हाही त्यापैकी एक अनुभव होता. बोधसूत्रच्या माध्यमातून मी श्रावण महिन्यामध्ये शिवाय नमः हे सदर सुरु केले. दर सोमवारी शिवाच्या वेगवेगळ्या रूपांना शब्दबद्ध करत होते. शिवाय नमः – एक अनुभव या शेवटच्या लेखाने मी या शृंखलेला पूर्णविराम देणार आहे. या प्रवासात नेहमीप्रमाणे थोडी धडपड, पडझड आणि नंतर सुंदर लेख […]
Aug 14

हरीहराय नमः

1882-83 साल. एक फ्रेंच अभ्यासक जो कम्बुज म्हणजे सध्याच्या कंबोडिया प्रांतामध्ये काही संशोधनार्थ गेला होता. फुनान मधील ताकेओ (Takeo) प्रांतातील नोम-दा (Phnom Da) या मंदिरातून एका देवता मूर्तीचे शीर्ष तो फ्रान्सला सोबत घेऊन गेला. फ्रान्समधील ग्युमेट (Guimet) संग्रहालयातील हे शीर्ष, 2016 साली कंबोडिया प्रांताला परत करण्यात आले. कंबोडिया सरकारने या निर्णयाचे स्वागत केले. इ.स. 7 व्या शतकातील […]
Aug 07

उमामहेश्वराय नमः

ऋग्वेद काळापासून शिव देवतेच्या संकल्पनेच्या विकासातील रुद्राचे दैवतशास्त्रीय स्वरूप, शिवाय नमः  या लेख शृंखलेचा पहिला भाग रुद्राय नमः मध्ये बघितले. दुसऱ्या भागात, याच रुद्राने त्रिपुरांचा विनाश करणारा त्रिपुरान्तकाय नमः हा लेख आपण बघितला. आज शिवाचे, उमेसोबत परिवार देवतेत होणारे रूपांतरण बघणार आहोत.  शिव अर्धांगिनी उमा म्हणजेच पार्वती. हिमवान आणि मेना यांची कन्या पार्वती आणि शिव यांचा विवाह होतो आणि उमा, […]
Jul 31

त्रिपुरान्तकाय नमः

प्राचीन संहिता, पुराणकथा आणि त्यामध्ये गुंफलेल्या काही संकल्पना या मूर्त रुपाला जन्म देत असतात. रुद्र या संकल्पनाचा विस्तार रुद्राय नमः या मागच्या लेखामध्ये आपण बघितला आहे. हाच रुद्र हातामध्ये धनुष्य धारण करून रथात आरूढ होणारा त्रिपुरान्तक शिव या संहारक रूपातून व्यक्त होताना दिसतो. तैत्तिरीय संहिता आणि शतपथ ब्राह्मणासारखे काही प्राचीन ग्रंथ आणि महाभारत, लिंगपुराण आणि […]
Jul 24

रुद्राय नमः

आज सोमवार, श्रावणमास आरंभ होतोय. बोधसूत्र वाचकांसाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतील हा पहिला लेख घेऊन आले आहे. देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. पिनाकपाणी रुद्र या देवतेसाठी ऋग्वेदामध्ये तीन ऋचा संकलित केल्या आहेत. हा रुद्र भयानक, उग्र आणि विनाशकारी आहे. पण सोबतच तो […]
May 10

कथा बुद्धजन्माची, एका कथनशिल्पाची

भारताच्या वायव्येकडे स्थित, एक प्रांत म्हणजे गांधार. या प्रांतात बहरलेली कला गांधार कला  या नावाने ओळखली जाते. ही कला, म्हणजे पूर्वेकडील भारत आणि पश्चिमेकडील ग्रीक, रोम, इराण आणि शक कलांची सांस्कृतिक समन्वितता आहे. भारताच्यादृष्टीने गांधार या प्रांताचे एक विशीष्ट स्थान आहे. प्राचीन काळात डोकावताना गांधार क्षेत्र राजकीय, धार्मिक आणि कलात्मक स्थित्यांतरचे ते एक प्रमुख केंद्र होते […]
May 01

लयनात दडलेला शिल्पातीत महाराष्ट्र

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्रदेशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा || राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा || राकट, रांगडा असलेल्या, कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशाची कल्पक आणि सौंदर्यदर्शक ओळख लपली आहे ती इथल्या लयन (लेणी) स्थापत्यामध्ये; आणि यातूनच साकार झालाय शिल्पातीत महाराष्ट्र. इथल्या ट्रॅप या […]