व्यक्तीसूत्र

Home \ व्यक्तीसूत्र
Mar 08

कऱ्हाडकन्या – अभिनव सरस्वती चन्द्रलेखा

कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या प्रीतिसंगमावर वसलेले गावं म्हणजे कऱ्हाड. सध्या कऱ्हाड किंवा कराड या नावाने परिचित हे गावं, प्राचीन करहाट किंवा करहाटक या नावाने ओळखले जात होते. ही कऱ्हाडकन्या अभिनव सरस्वती चन्द्रलेखा, शिलाहार राजवंशातील राजकन्या म्हणजे साक्षात कला, ज्ञान आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम होती. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात शिलाहार राजवंशाची एक शाखा ही […]
Jul 13

कालिदास दिन – आषाढस्य प्रथमदिवसे

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श। आज आषाढाचा पहिला दिवस. काळ्या मेघांनी आसमंत भरून जाणार आणि विद्युल्लतेसह अमृतधारा बरसवणार. रामगिरीच्या उत्तुंग पर्वतावर उतरलेला काळा ढग, म्हणजे जणू मदमस्त हत्ती त्याच्या शक्तीनिशी ढूश्या मारतो आहे. हे दृश्य डोळ्यात साठवत विरहव्याकुळ यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. सृजनाचा सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षी असलेला यक्ष त्याची व्याकुळ अवस्था मेघाला कथन करतो […]
May 16

डॉ. मधुकर केशव ढवळीकर – स्मृतिकोश

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर मध्ये 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2017 दरम्यान गणेश – आशियाचे दैवत या डॉ. मधुकर केशव ढवळीकर सरांच्या पुस्तकावर आधारित चित्रप्रदर्शन सादर करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी मला स्वयंसेवी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अर्थात ही संधी मिळाली पेक्षा ही संधी मी घेतली म्हणणे अधिक उचित ठरेल. ढवळीकर सरांना प्रत्यक्ष […]
Mar 08

परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी

९ | यशःशेषतां [|* ] देवी शेषफणावलीव सकलक्ष्मापीठभारं हरेः [*] १० | पादाम्भोजरजः पवित्रितशिरामाता तदियादधेऽ [||*] स्वधाममहिमप्रताप्तभु- ११ | -वनतृ[त्रि]तयोन्नतिः या जगत्सु श्रीतृ[त्रि]भुवनदेवीति विश्रुता [*] [शुभकारा देव ४ याचा तालचेर ताम्रपट] जेव्हा तो [शुभकारा देव २] आपल्या यशाच्या अंतिम चरणात पोहोचला तेव्हा, त्याची माता जी त्रिभुवनमहादेवी या नावाने तीनही जगात प्रसिद्ध आहे, तिने राज्याचा सगळा […]
Mar 08

सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले

पुराभिलेखविद्या आणि त्याच अनुषंगाने मी सध्या शिकत असलेला नाणकशास्त्र  ह्या विषयांच्या आधारे आपल्याला तत्कालीन सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी, धार्मिक व्यवस्था आणि आर्थिक उलाढालींची कल्पना येते. शिवाय हे लेख आणि नाणी विश्वासार्ह्य असल्याने त्यांच्या अभ्यासाचे अतिशय महत्व आहे, किमान भारतीय इतिहासासाठी तरी. पण प्राच्यविद्या शिकताना केवळ जुन्या अवशेषांची, लेखांची, नाण्यांची, मूर्तींची मदत होते असे नाही तर […]