goddess kali

Home \
Oct 18

नवरस आणि देवी शिल्पे : एक अनुभव

त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनम्  त्रैलोक्यातील समस्त भावांचे प्रस्तुतीकरण किंवा अनुकीर्तन म्हणजे नाट्य. भरतमुनींच्या रससिद्धांतानुसार नाट्य म्हणजेच काव्य. या सूत्रामधून खरंतर या लेखमालेचा जन्म झाला, असे म्हणता येईल.शिल्पकलेचा अभ्यास करताना मला कायम असे वाटते, शिल्प म्हणजे खरेतर काव्यच आहे. शब्दरूपा पेक्षा साक्षात साकार रूपातील एक काव्य. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर जेव्हा परमोच्च भाव प्रकट होतो, […]
Oct 07

भयानक रस – करालवदना : नवरस आणि देवी शिल्पे

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस शृंगार जो उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून आपण अनुभवला. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये हास्य रस बघितला. देवीच्या त्रिपुरा या रूपातून करूण रसाची अनुभूती घेतली. क्रोधाने रौद्र रूप धारण केलेल्या कालीचे स्वरूप बघितले. महिषासुरमर्दिनीच्या रूपात वीर रसातील उत्साह अनुभवला. या लेखामध्ये देवीच्या काली स्वरूपातील दुसऱ्या शिल्पातून व्यक्त […]
Oct 05

रौद्र रस – काली : नवरस आणि देवी शिल्पे

रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये रौद्र रसाची कर्मे म्हणजे या रसामुळे काय काय होते हे पुढील श्लोकातून व्यक्त करतात –  ताडनपाटनपीडनच्छेदनप्रहरणशस्त्र – सम्पातसम्प्रहाररुधिराकर्षणाद्यानि […]