intagible heritage

Home \
Jan 14

तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व

पौष महिना सुरु झाला की लगबग सुरु होते ती मकर संक्रांतीची. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत नात्यांमध्ये माधुर्य वाढवणारा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आत्ता जरी मकर संक्रांतीचे स्वरूप हे सणाचे असले, तरी हे भारतीय धार्मिक व्रतांपैकी एक व्रत होते. सध्या आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा […]
Nov 19

आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे […]
Apr 22

पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

पंजाब, भारतातील उत्तर पश्चिमी भाग हा तिथल्या मेहनती लोकांसाठी आणि तिथल्या दमदार संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अमृतसर जवळील जन्दियाला गुरु, पंजाब इथे एक विलक्षण संस्कृती बघायला मिळते जी फाळणीनंतरच्या स्थलांतराचा परिणाम आहे. जन्दियाला गुरु ह्या ठिकाणी काही लोकं तांबे, पितळ आणि काही मिश्रधातू ह्या पासून पारंपारिक पद्धतीने भांडी बनवण्यात कुशल आहेत. तांबे, पितळ सारख्या धातूंचे मोडीत घातलेल्या […]
Apr 21

संकीर्तन

सत् युगामध्ये विष्णूच्या ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञीय समर्पणाने, द्वापार युगामध्ये भगवंताच्या चरण सेवेने जे फळ प्राप्त होईल तेच कलीयुगामध्ये केवळ संकीर्तनाने साध्य होईल, हे मानणारी परंपरा म्हणजे मणिपुरमधील संकीर्तन. इ.स. 15 शतकात मणिपूरचा राजा भागचन्द्र सिंह ह्याने संकीर्तन जनसामान्यात रुजवले. संकीर्तन म्हणजे ज्ञानाचे माध्यम मानणाऱ्या वैष्णव पंथीय लोकांची परंपरा आहे. मणिपुरी लोक यज्ञीय समर्पण किंवा […]
Apr 20

बौद्ध पठण परंपरा, लडाख

बौद्ध धर्मशाळा आणि लडाख मधील गावात बौद्ध लामा किंवा धर्मगुरू, त्यांच्या पवित्र मंत्राचे पठाण करतात. हे पवित्र मंत्र त्यांचे तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण सांगणे आहे. लडाखमध्ये महायान आणि वज्रयान ह्या पंथाची उपासना चालते. त्यापैकी चार महत्वाचे संप्रदाय मानले जातात. हे संप्रदाय म्हणजे न्यागम, कागयुड, शाक्य आणि गेलूक. प्रत्येक संप्रदायाची मंत्र पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे. हे […]
Apr 19

छउ नृत्य

पूर्व भारतातील एक नृत्य प्रकार म्हणजे छउ. छउ ह्या नृत्यामध्ये महाभारत आणि रामायण किंवा कधीकधी स्थानिक लोकांच्या कथा सादर केल्या जातात. छउ ह्याचा संस्कृत शब्द होतो, छाया म्हणजे सावली किंवा छावणी. ही नृत्यशैली वडील आपल्या मुलाला शिकवतात आणि हा वारसा पुढे प्रवाहित होतो. नृत्य लढाऊ शैलीचे असल्याने ह्यात उत्साहपूर्ण  हालचाली आणि प्रचंड ताकद आवश्यक असते, त्यामुळे […]
Apr 17

कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

राजस्थानमधील साप पकडणाऱ्या कालबेलिया लोकांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत आहे. कालबेलिया हे भटक्या जमातींपैकी एक असून ते जिथे राहतात त्यांना डेरा म्हणतात. हे गरुडी लोकं त्यांच्या जवळच्या वेतापासून बनवलेल्या टोपीतून सापांना घेऊन गावातील घराघरातून दानं मागत फिरतात. कालबेलिया जमातीचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे. कालबेलिया जमातीच्या लोकांसाठी त्यांची परंपरा, हा अभिमानाचा विषय आहे. कालबेलिया जमातीमधील […]
Apr 16

मुडीयट्टू

मुडीयट्टू हा केरळ मधील मंदिरात सादर होणारा धार्मिक नृत्य, नाट्य प्रकार आहे.  देवी काली आणि क्रूर राजा दारूक यांच्या युद्धप्रसंगावर आधारित पौराणिक कथेशी संबंधित हा विधी आहे. हा धार्मिक विधी हा स्थानिक समुदाय एकत्र येऊन साजरा करतात. मुडीयट्टू सदरीकारंचा मूळ हेतू शुद्धीकरण आणि नवीन उत्साह जनसामान्यात राहावा हा आहे. उन्हाळी पिकांच्या कापणी नंतर एका ठराविक दिवशी […]
Mar 21

नवरोझ

नवरोझ म्हणजे पारशी नववर्ष. नवरोझ इंग्रजीमध्ये Novruz, Nowrouz, Nooruz, Navruz, Nauroz किंवा  Nevruz अश्याप्रकारे विविध पद्धतीत लिहिले जातात. सांस्कृतिक दृष्टीनी महत्वाच्या असलेल्या ह्या पारशी सणासाठी अनेक देशांनी पुढाकार घेऊन ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ह्या देशांमध्ये भारत, इराण,पाकिस्थान, उजबेगीस्थान, अझरबैजान, किर्गीजस्थान आणि तुर्कस्थान ह्यांचा समावेश आहे. विशाल भौगोलिक क्षेत्रावर वसंत ऋतूच्या […]
Feb 20

रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

रम्मन हा हिमाचल प्रदेशातील घढवाल प्रदेशातील संरक्षक देवाच्या सन्मानार्थ केला जाणारा धार्मिक सण आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस, हे कृषिप्रधान संस्कृतीतील लोकं रम्मन साजरा करतात. उत्तराखंडातील सलूर -डुंग्रा ही दोन जोडगावे हा सण एकत्र  येऊन करतात.  भूमियाल देवता ह्या स्थानिक संरक्षक देवता मानतात. ह्यात अनेक क्लिष्ट स्वरूपाचे विधी केले जातात. रामायणावर किंवा रामावर आधारित […]