Archives for February, 2017

Home \ 2017 \ February
Feb 24

चंद्रशेखर शिव

आज सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. शिव भक्तांसाठी महाशिवरात्रीचे महत्त्व अधिकच आहे. माघ वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजेच महाशिवरात्र, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. महाशिवरात्रीशी संबंधित अनेक कथांचा वेगवेगळ्या पुराणांमधून उल्लेख येतोच. त्या कथांच्या माध्यमातून शिवाच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शनही आपल्याला होत असते. या सर्व कथांपैकी, आज बोधसूत्रच्या माध्यमातून मी शिवाच्या एका अतिशय मनोरम आणि लोभस […]
Feb 20

रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

रम्मन हा हिमाचल प्रदेशातील घढवाल प्रदेशातील संरक्षक देवाच्या सन्मानार्थ केला जाणारा धार्मिक सण आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस, हे कृषिप्रधान संस्कृतीतील लोकं रम्मन साजरा करतात. उत्तराखंडातील सलूर -डुंग्रा ही दोन जोडगावे हा सण एकत्र  येऊन करतात.  भूमियाल देवता ह्या स्थानिक संरक्षक देवता मानतात. ह्यात अनेक क्लिष्ट स्वरूपाचे विधी केले जातात. रामायणावर किंवा रामावर आधारित […]
Feb 15

कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी

कूडियाट्टम् केरळ ह्या प्रांतामधील प्राचीन संस्कृत नृत्यनाट्य प्रकार आहे. ही भारतामधील सर्वात प्राचीन जिवंत नाटक परंपरा म्हणता येईल. कूडियाट्टम् हे नृत्य-नाट्य म्हणजे अभिजात संस्कृत आणि केरळमधील स्थानिक परंपरा ह्यांना जोडणारा एक धागा आहे. साधारण 9 व्या शतकात ही नृत्यशैली केरळमधील सर्व मंदिरांमध्ये बघायला मिळते. कूडियाट्टम् ची लोकप्रियता, त्याचे नाट्यमय सादरीकरण आणि प्रसार पुढे इ.स.15 शतकापर्येंत […]
Feb 09

रामलीला

रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु। तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ।। – तुलसीदास (रामचरित मानस) तुलसीदास त्यांच्या दोह्यात म्हणतात, रामकथा मंदाकिनी नदीप्रमाणे आहे जी सुंदर, निर्मळ आहे, ती चित्रकूट प्रमाणे चित्तवेधक आहे. तुलसीदासाचे स्नेह हेच वन आहे ज्यात श्री राम विहार करत आहे. रामलीला याचा शब्दशः अर्थ होतो रामाच्या लीला किंवा रामाच्या आयुष्यावर […]
Feb 02

वेद पठण परंपरा

भारतीयांसाठी वेद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. वेदांची पवित्रता ही सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. म्हणूनच बृह्दारण्यक उपनिषदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणजे परमात्म्याचे निश्वास म्हटले आहेत. अस्य महतो मूतस्य निःश्वसितमेतद् यद् ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्वांगिरसः | – बृह्दारण्यक वेद, भारतीय परंपरेतील संस्कृत रचनांचे अतुलनीय कोष आहेत, दार्शनिक संवाद, मिथक आणि अनुष्ठान मंत्र ह्यांचे भांडार आहे. जगातील सर्वात […]