रामलीला

Home \ बोधसूत्र \ रामलीला

रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु।
तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ।।

– तुलसीदास (रामचरित मानस)

तुलसीदास त्यांच्या दोह्यात म्हणतात, रामकथा मंदाकिनी नदीप्रमाणे आहे जी सुंदर, निर्मळ आहे, ती चित्रकूट प्रमाणे चित्तवेधक आहे. तुलसीदासाचे स्नेह हेच वन आहे ज्यात श्री राम विहार करत आहे.

रामलीला याचा शब्दशः अर्थ होतो रामाच्या लीला किंवा रामाच्या आयुष्यावर सादर होणारे खेळ. रामलीला मधील सादरीकरण हे तुलसीदासांच्या रामचरित मानसावर आधारित आहे.

Intangible Heritage of India – Ramlila

हे सादर करताना त्यात रामायण या  महाकाव्यातील प्रसंग नाटकीय रूपात सादर केले जातात. यात नृत्य, नाट्य, संगीत, संवाद, वर्णन यांचा समावेश असतो. रामलीला भारतामधील लोकप्रिय सांस्कृतिक ठेवा आहे विशेषतः उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये दसऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी रामलीलांचे आयोजन होते.

रामलीला हे सर्व  मानवजातीच्या ऐक्याच्या दृटीनेही महत्त्वाचे मानले जाते कारण रामलीला बघायला सर्व जाती-धर्माचे लोकं  एकत्र येतात आणि रामलीलेचा आनंद घेतात.       

अनेक ठिकाणी रामलीला सादर केल्या जातात परंतु त्यापैकी अयोध्या , रामनगर, वृन्दावन, अलमोरा, सत्तना आणि मधुबनी येथे सादर होणाऱ्या रामलीला अधिक लक्षणीय आहेत. रामलीलेचे सादरीकरण जवळजवळ 10 ते 12 दिवस चालते. रंगमंचावरील प्रस्तुत प्रेक्षकांनाही उत्स्फुर्तपणे सहभागी होता येते, त्यामुळे लोकं त्याचा अधिकच आनंद अनुभवू शकतात.

रामलीला ही परंपरा जवजवळ चारशे वर्ष टिकून आहे त्यामुळेच 2008 साली रामलीला या प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात कूडियाट्टम् ह्या केरळ मधील संस्कृत रंगभूमी विषयी जाणून घेऊ.

(क्रमशः)

Photo Credits : Shriram Bharatiya Kala Kendra

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

2 thoughts on “रामलीला

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.