बौद्ध धर्मशाळा आणि लडाख मधील गावात बौद्ध लामा किंवा धर्मगुरू, त्यांच्या पवित्र मंत्राचे पठाण करतात. हे पवित्र मंत्र त्यांचे तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण सांगणे आहे.
लडाखमध्ये महायान आणि वज्रयान ह्या पंथाची उपासना चालते. त्यापैकी चार महत्वाचे संप्रदाय मानले जातात. हे संप्रदाय म्हणजे न्यागम, कागयुड, शाक्य आणि गेलूक.
प्रत्येक संप्रदायाची मंत्र पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे. हे संप्रदाय त्या मंत्राचे पठण कालचक्र विधी, बौद्ध धर्मातील महत्वाच्या दिवशी किंवा कृषी दिनदर्शिकेप्रमाणे म्हणायची प्रथा आहे. ह्या मंत्र पठणाचा मूळ हेतू हा आहे कि लोकांचे अध्यात्मिक आणि नैतिक कल्याण व्हावे. तसेच मानसिक शुद्धता आणि शांतता प्रस्थापित व्हावी. दुष्ट शक्तींना खुष करून घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे मंत्र पठण करतात. ह्या मंत्र पठणाने बुद्ध, बोधिसत्व, इतर देवता आणि रिन्पोचे (धर्मगुरु) ह्यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे मंत्र समूहाने म्हणायचे असतात.
एकतर घरामध्ये किंवा बौद्ध मठामध्ये नृत्य करून हे मंत्र म्हटले जातात. हे मंत्र खाजगी घरांमध्ये किंवा अंगणात म्हणता येतात. बौद्ध मंत्र पठण परंपरा म्हणजे एक कलात्मक अभिव्यक्ती आहे जी बौद्ध अनुयायांचा बौद्ध धर्मावरील विश्वास दर्शवते.
Shargangrima
ही गेलूक संप्रदायाची पठण परंपरा आहे. ह्याचे मंत्र पठण हे भिक्षु ही करतात आणि सामान्य लोकही करतात. ह्यांच्या पठणाच्या काही कडक नियमांचे पालन करावे लागते. ह्यात आवाजाचे स्वरनियमन महत्वाचे असते. लामा ह्या मंत्राचे पठण मोठ्याने म्हणून इतर लामा आणि बौद्ध भिक्षुंकडून म्हणवून घेतात.
Nasthan Phyagdzod
हे मंत्र हे बुद्धाच्या 16 अर्हतांच्या साठी म्हटले जाते. बुद्धाची शिकवण समजवण्यासाठी हे 16 अर्हत पृथ्वीवर सदैव राहावेत ह्यासाठी ही प्रार्थना केली जाते. ह्यात पद्धतीत भिक्षु प्रतीकात्मक रूपात संगीत, सुगंधी द्रव्ये, नृत्य, फुले, दिवा आणि भोजन ह्या अर्हतांना अर्पण करतात.
प्रत्येक छंदानंतर मध्ये मध्ये बासरी, झांज, ढोल आणि घंटी वाजवली जाते. भिक्षुंना ह्या मंत्र पठणासाठी गावातील घरांमध्येही बोलावले जाते. हे भिक्षु वाईट शक्तींना किंवा देवतांच्या रागाला शांत करून त्यांच्या कृपाशिर्वादासाठी घरांमध्ये पठण करतात.
Kunrig
शाक्य आणि गेलूक संप्रदायातील बौद्ध भिक्षु हे मंत्र पठण करतात. हे मंत्र पठण करताना ते स्वतः ज्ञानप्राप्ती करून घेतली आहे असे समजून विविध हस्त मुद्रा करतात. बुद्धाची शिकवण आणि त्याची इतर विशिष्ट लक्षणे ही ह्या मुद्रांमधून व्यक्त करतात. मंत्र पठण करताना भिक्षु स्वतःला ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी मानतात, जिथे त्यांच्या अजुबाजूला बुद्ध, बोधिसत्व, दिव्य लोकं, संरक्षक देवता, इतर देवता आणि रिन्पोचे असतात. ह्यांचे प्रमुख भिक्षु हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी समाजात फिरतात.
Chod
ह्या मंत्र पठणाच्या परंपरेत भौतिक शरीर हे चैतन्यापासून वेगळे होते. हे मंत्र एकांतात, स्मशानात म्हटले जातात. ह्या मंत्रांसाठी एकाग्रतेची आवश्यकता असते आणि निवडक भिक्षुंनीच ते म्हणायचे असतात. हे भिक्षु त्या मंत्र पठाणाची दीक्षा घेतात.
मंत्र पठण हे लडाख मधील मठांमध्ये किंवा प्रार्थना गृहांमध्ये दैनंदिन चालणारा भाग आहे, त्यामुळे मंत्र पठण हा तिथला सांस्कृतिक ठेवा आहे जो स्थानिक लोकांच्या आणि भिक्षूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
2012 साली ह्या बौद्ध मंत्र पठण परंपरेला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात मणिपूर मधील संकीर्तनाची माहिती घेऊया.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
2 thoughts on “बौद्ध पठण परंपरा, लडाख”