Author: Dhanalaxmi

Home \
Aug 06

मातृकांसह नृत्यरत शिव

ताण्डवप्रिय शिवाच्या एकशे आठ करणांचा उल्लेख भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात येतो. तामिळनाडू येथील चिदंबरम्, तंजावूर येथील बृहदिश्वर, कुम्भकोणम् येथील सारंगपाणी मंदिर आणि सातारा येथील नटराज मंदिर येथे या करणांची शिल्पांमधील अभिव्यक्ती बघायला मिळते. भरतमुनी करण लक्षण सांगताना म्हणतात –  हस्तपादसमायोगो नृत्यस्य करणं भवेत् म्हणजे हस्त आणि पदन्यास यांचे एकत्रित संचलन म्हणजे करण. प्रत्येक करणाचे स्वतःचे असे […]
Aug 05

CERN आणि नटराज

विश्वाच्या उत्पत्ती विषयी असलेले कुतूहल अगदी प्राचीन काळापासून मानवाला आहेच. शुद्ध विज्ञानाधीष्टीत आणि तर्कशुद्ध बुद्धीने मानवाने विश्वोत्पत्तिचे महास्फोट (Big Bang Theory) सिद्धान्त, स्थिर स्थिती (Steady State Theory) यांसारखे विविध सिद्धान्त जगासमोर वेळोवेळी मांडले आहेत. संस्कृतीच्या कवडस्यातून बघितले तर जगातील सर्वच संस्कृतींमध्ये विश्व निर्मितीला धरून विविध मिथकांचाही जन्म झालेला आहे, असे दिसते. भारतीय परंपरेत दार्शनिक आणि […]
Mar 08

द्वादश ज्योतिर्लिंग

भारतामध्ये भगवान शिवाला समर्पित अनेक शैवक्षेत्र आसेतुहिमाचल पसलेली आहेत. परंतु भारतीय परंपरेत या शैव क्षेत्रांमध्ये द्वादश ज्योतिर्लिंग ही विशेष महत्त्वाची आहेत. शिवाय परंपरेने या स्थानांना तीर्थक्षेत्राचे महत्त्व लाभलेले आहे. त्यामुळे या द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा भाविक पुण्यार्जनासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी करतात. या बारा ज्योतिर्लिंगांच्या समूहामध्ये अनेक साधर्म्य आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी बहुतांश ही अनादितीर्थे म्हणता येतील. म्हणजेच ज्योतिर्लिंग […]
Nov 04

भक्तशिरोमणी संत नामदेव

मध्ययुगामध्ये संपूर्ण भारतात सुरु झालेल्या भक्तिपरंपरेतील एक महत्वाचे नाव म्हणजे भक्तशिरोमणी संत नामदेव. यांचा काळ इ.स १२७० ते इ.स. १३५० असा मानला जातो.  ज्ञानदेव म्हणे तूं भक्त शिरोमणी | जोडिले जन्मोनि केशव चरण || ज्ञानदेवांनी दिलेल्या ‘भक्तशिरोमणी’ या उपाधी वरूनच नामदेवांच्या भक्तभावाची कल्पना येते. भारतामध्ये त्या काळात मुसलमानी आक्रमणांनी जोर धरल्याने समाजात आणि जनसामान्यांच्या मनामध्ये […]
Feb 05

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति

आज वसंतपंचमी, मकर संक्रमणानंतर माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी. वसंतपंचमीला वसन्त ऋतूचे पहिले पाऊल पडते आणि निसर्ग आपली कूस बदलतो. निसर्गाच्या बदलत्या रूपात वसन्त ऋतू वेगवेगळे रंग भरायला सुरुवात करतो. प्राचीन भारतीय परंपरेत या निसर्गोत्सवा सोबतच मदनोत्सव, श्रीपंचमी आणि ज्ञानपंचमी म्हणून हा दिवस साजरा केला जात असे. आजही उत्तर-पूर्व भारतात वसंतपंचमीला सरस्वती पूजन करून विद्यारंभ […]
Jul 23

स्वाध्याय सुधा सूत्र 10 महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती

भगवान शिव म्हणजे परमतत्त्व. या परमशिवाचे तत्त्वरूप अत्यंत व्यापक आणि कल्याणकारी आहे. शिवस्वरूप म्हणजे खरतरं निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् असे आहे. शिव तत्त्वाचा अर्थबोध शब्दांच्या परीघा पलीकडे जाऊन चित्ताला तुष्टी देणारा आहे. भगवान शिवाला शिवो गुरुः शिवो वेदः शिवो देयः शिवः प्रभुः म्हणताना, प्रथम गुरु म्हणून संबोधले आहे. सर्व शास्त्र, विज्ञान, विद्या आणि कला […]
Jul 16

स्वाध्याय सुधा सूत्र 9 कलादेवी नमस्तुभ्यं – रूपभेद

कला म्हणजे काय? कला म्हणजे माणसाच्या सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद आहे. – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद हे भारतीय कलेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. यथार्थ दर्शनाचे अनुकरण हा भाग भारतीय चिंतनामध्ये अभिप्रेत नाही. भारतीय दर्शन परंपरा असो वा कला परंपरा आत्मचैतन्य जाणण्याची ही प्रक्रिया सर्वत्र समांतर चालते. आत्मतत्त्व जाणण्याचे आणि ते […]
Jul 09

स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

‘कला’ या शब्दाची व्याप्ती अपार आहे. कलेसारखी दिव्य शक्ती माणसाच्या जीवनाला सौंदर्य, उल्हास, लालित्य, प्रतिभेने संपन्न करते. कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती जिथे येते, तिथे कलात्मक नवसृजन दिसतेच. कला म्हणजे नित्य साधना आणि नित्य चिंतन यांतून प्रगल्भ होत जाणाऱ्या अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे कलासाधनेत कोणतेच हमरस्ते उपयोगी पडत नाहीत. कोणत्याही कलाकृतीचे सृजन होताना अनेकविध क्रिया या कार्यरत […]
Jun 25

स्वाध्याय सुधा सूत्र 7 सुमनत्वाची कामना

आपण सर्वच समूहप्रिय लोक आहोत. पण केवळ समूह म्हणजे समाज नव्हे. एक सातत्यशील आणि सहकारी सामाजिक समूह ज्यांच्यामध्ये कार्य साध्य करण्यासाठी सुसंघटीत असा आकृतिबंध तयार झाला आहे, त्याला समाज म्हणता येईल. या समाजात राहून आपण आपले जीवन अधिक उन्नत करण्याच्या दृष्टीने संस्कृती आपल्याला सामाजिक भान देते. असे सामाजिक भान वैदिक काळातील समाजात निर्माण होत होते, […]
Jun 18

स्वाध्याय सुधा सूत्र 6. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 2)

सिद्धांत आणि साधना यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या या योगदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः या स्वाध्याय सुधाच्या पूर्वसूत्रामध्ये आपण योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास पाहिला. याशिवाय योगदर्शनाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेतले. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे नेमके काय? आणि योगसूत्रातील या सूत्रामध्ये आलेल्या चित्तवृत्ती कुठल्या हेही पाहिले. स्वाध्याय सुधाच्या या सूत्रामध्ये आपण या चित्तवृत्तींचा क्षय करण्याचे साधन कोणते […]