बोधसूत्र

Home \ बोधसूत्र
May 28

स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेचा आरंभ श्रीगणेशाच्या स्तवनाने होतो. या मंगलाचरणामध्ये माउली एक एक ओवीमधून शब्दब्रह्म गणेशाचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करीत जातात. जसे हे शब्द आकार घेतात, तशी श्रीगणेश प्रतिमा आपल्या मनःपटलावर साकार होत जाते. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व सूत्राच्या पूर्वार्धामध्ये या वेदाधिष्टीत श्रीगणेशाचे मूर्तरूप, त्याच्या देहावर सजलेले पुराणोक्त काव्य, नाट्यादिकांचे वस्त्रालंकार आपण बघितले. आज या […]
May 21

स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।। 1 ।। कोणत्याही कार्याचा आरंभ, आपण श्रीगणेशाच्या पूजनाने करतो. गणेश या देवतेचा दैवतशास्त्रीय विचार स्वतंत्रपणे करणे उचित ठरेल. आजच्या स्वाध्याय सुधाच्या या भागात मात्र श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्वाचा विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.  भगवान श्रीकृष्णाने मुखर केलेली श्रीमद् भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या अलगद, हळुवार शब्दांमधून […]
May 14

स्वाध्याय सुधा सूत्र 1. आरंभ

भारतविद्या सारखा विषय, म्हणजे खरतर अनेकविध विषयांचा एक समुच्चय. ही विद्याशाखा अंतःविषय (Interdisciplinary) म्हणजे अनेक वेगवेगळ्या ज्ञानशाखा संगठीतपणे अभ्यासण्याची, अश्या स्वरूपाची आहे. मी खरतर दृश्यकलेमुळे, प्राचीन भारतीय कलेकडे अधिक ओढली गेले. त्यातूनच आज प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य आणि प्रतिमा विज्ञान या विषयामध्ये संशोधन करते आहे. औंढा नागनाथ देवालयासारखे बृहद् देवालय अभ्यासायला घेणे, ही माझ्या वैचारिक […]
Jun 19

प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

सतराव्या शतकातली, हिमाचल मधल्या गुलेर या लहानशा गावातली एक सकाळ. तिशीच्या वयातला तरुण, शिडशिडीत चित्रकार नैनसुख, दगडाळ, तीव्र उताराच्या रस्त्यावरुन मार्गक्रमणा करतो आहे, रावीच्या खळाळत्या, वेगवान पात्राच्या वाहत्या दिशेने. सपाटीवरच्या जसरोटा संस्थानाच्या दरबारात लघुचित्रकार म्हणून रुजू होण्याकरता तो निघाला आहे. राजकीय उलथापालथ, नवे काम मिळवणे अशा अनेक कारणांनी लघुचित्रकार स्थलांतरित होत होते. नैनसुखच्या हातातल्या काठीला […]
Jun 12

भारतीय हस्तचित्रित नकाशांमध्ये शिवाचे चित्रण

जोधपूर शिवरहस्याचे सखोल संशोधन आणि विकास : इ.स. 1827 च्या आसपास जोधपूरच्या दरबारी कलाकारांनी शिव रहस्य नामक एक भव्य सचित्र हस्तलिखित ग्रंथ तयार केले, जे कदाचित भारतीय दरबारी चित्रकलेच्या इतिहासामध्ये या पूर्वी कधीच चित्रित केले गेले नव्हते. जोधपूरच्या महाराजा मानसिंग (इ.स. 1803-43) यांनी स्वतः चित्रकारांना या भव्य कामासाठी नियुक्त केले. हे चित्रे त्याच नावाच्या मजकूरावर […]
Jun 07

श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः आणि सिंहासन

राजा कालस्य कारणम्, राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः, ना विष्णुः पृथिवीपतिः या आणि अनेक अशा संकल्पनांद्वारे आपणास राजाचे महत्त्व भारतीय इतिहास आणि संस्कृतीमध्ये दिसून येते. भारतीय इतिहास, संस्कृती, राजकारण, लोकाचरण यावर धर्माचा पगडा दिसून येतो. आपल्याकडील साहित्य आणि तत्त्वज्ञानावर सुध्दा धर्माचा पगडा असल्याने धर्मकेंद्री आणि नीतीतत्त्वे यांची परिभाषा स्पष्ट करणाऱ्या साहित्याची निर्मीती प्राचीन काळात […]
Jun 01

गंगावतरण – हर गंगे भागीरथी

गंगा अवतरणाला कारणीभूत होता भगीरथ. या भगीरथाने त्याच्या घोर तपोबलाने देवी गंगेला पृथ्वीवर आणले. एकार्थी ती भगीरथाची कन्या झाल्याने गंगेला भागीरथी हे नाव गंगेला प्राप्त झाले. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याचा प्रसंग वेगवगेळ्या कथा भागांतून आपल्या समोर येतो. महाभारतातील वनपर्वात गंगा अवतरणाची कथा येते. गंगा प्रत्यक्ष भूतलावर येणे हा दिव्य अनुभूति देणारा एक सोहळा म्हणता येईल. […]
May 29

वैभवशाली उस्मानाबाद

देशासह जगातील इतिहास पाहता आपल्याला काही प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या दिसतात. त्यात इजिप्त, रोम, भारत, युरोप इत्यादी देश प्रामुख्याने आहेत. त्यात भारतामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन अशी विकसीत व पुढारलेली सिंधू संस्कृती नांदत होती हे उत्खननातून सप्रमाण सिद्ध झाले आहे. या संस्कृतीची ठिकाणे ही आजच्या पाकिस्तानमधील मोहोंजोदाडो व भारतातील राखीगढी, लोथल (गुजरात) इत्यादी भागात असून […]
May 23

इतिहासातील नाण्यांचे बनावटीकरण

बनावटिकरण किंवा खोटेपणा हा आपल्याला आज प्रत्येक गोष्टीमधे पहावयास मिळतो आणि चलनही त्याला अपवाद नाही. चलन नवे असो किंवा जुने त्याचे बनावटिकरण होतेच. आज आपण वापरत असलेल्या नाण्यांचे, नोटांचे देखील बनावटीकरण होते. त्याचे हेतु वेगवेगळे असु शकतात. पण या सर्वात एक उद्देश सारखा आहे आणि तो म्हणजे नफा कमविणे. नविन नाण्यांच्या बनावटीकरणामुळे देशाचे आर्थिक स्थैर्य […]
Apr 02

श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर आणि कथाशिल्प

पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य या क्षेत्रावर पसरलेले होते. विजयनगर साम्राज्यातील राज्यांनी त्यांचे आधिपत्य स्थापन करून या संपूर्ण नगरीची पुनर्रचना केली होती हे, सध्या इथे असणाऱ्या […]