सुगम

Home \ sugama
May 30

सप्तमातृका

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा । वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ॥ अमरकोष 1.16 अमरकोषामध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी आणि चामुण्डा या सप्तमातृकांचा लोकमाता म्हणून उल्लेख येतो. अगदी प्राचीन काळापासूनच या पूजनीय ठरलेल्या आहेत. प्राचीन काळ म्हणजे नेमक्या किती वर्षांपासून या लोकांच्या जीवनाचा भाग आहेत, असा प्रश्न स्वाभाविकच मनात येतो. अभ्यासकांच्या मते […]
May 23

त्रिविक्रम

भगवान विष्णूच्या चतुर्विंशति प्रतिमांचा उल्लेख विविध पुराणे, वैष्णव संहिता आणि काही स्मृतीग्रंथांमध्ये येतो. चतुर्विंशति प्रतिमा म्हणजे विष्णूच्या चोवीस मूर्ती. या चोवीस मूर्तींपैकी एक म्हणजे त्रिविक्रम विष्णू.   भगवान विष्णूच्या दशावतार प्रतिमांमध्येही वामन अवतार हा त्रिविक्रम रूपाशी जोडला जातो. परंतु चतुर्विंशति प्रतिमांतील त्रिविक्रम हा चतुर्व्यूह संकल्पनेतून विस्तारत जाऊन व्यूहांतर कल्पनेचा भाग झाला आहे. त्रिविक्रमस्त्रिषु गदाचक्रशङ्खान् बिभर्ति […]
May 11

विष्णुरूपा वैष्णवी

वैष्णवी विष्णुसदृशी गरुडोपरि संस्थिता | चतुर्बाहुश्च वरदा शङ्खचक्रगदाधारा || रूपमण्डन 5.66 रूपमण्डन  या ग्रंथामध्ये वैष्णवीसाठी आलेल्या या श्लोकाचा अर्थ असा होतो की, वैष्णवी ही विष्णूप्रमाणे दिसणारी असावी. गरुडावर स्थित असावी. तिच्या चार हातांमध्ये वरद मुद्रा, शंख,चक्र, गदा अशी आयुधे असावीत. सप्तमातृका समूहातील वैष्णवी म्हणजे विष्णूचे प्रतिरूप. त्यामुळे अनेक प्रतिमांमध्ये वैष्णवीच्या पायाशी विष्णूचे वाहन सुपर्ण म्हणजे […]
Apr 25

चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्

केरळ राज्यातील कलाडी या गावामध्ये श्री शंकराचार्य यांचा शिवगुरू आणि आर्याम्बा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी जन्म झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी श्री शंकराचार्य यांनी चतुर्वेद आणि शास्त्रग्रंथांचे अध्ययन पूर्ण केले. आपल्या मातेची अनुज्ञा घेऊन सद्गुरूच्या शोधात निघाले. नर्मदा तटावरील ओंकारेश्वराला श्री शंकराचार्य येऊन पोहोचले. त्यावेळी भगवत्पूज्यपाद गोविंदयती हे एका गुहेमध्ये साधना करीत होते. श्री शंकराचार्य […]
Oct 07

समुद्रोद्भव शंख

शंख म्हणजे समुद्रामध्ये निवास करणारा एक जलचर. भारतीय संस्कृतीमध्ये शंखाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतोच. आपल्या धार्मिक विधी, पूजा – अनुष्ठानामध्ये शंख पावित्र्याचे प्रतिक मानला जातो. भारतीय परंपरेत जितके धार्मिकदृष्टीने शंखाचे महत्त्व आहे तितकेच त्याचे सामजिक अस्तित्वही अगदी प्राचीन काळापासून आपल्याला बघायला मिळते. सिंधूसंस्कृतीचा मागोवा घेतला तर जवळपास इ.स.पूर्व  3,000 वर्षांपूर्वी शंखापासून बनवलेल्या वस्तूंचा पुरावा उत्खननातून […]
Oct 10

सृजनरूपा प्रकृति

प्राचीन काळापासून शक्ति उपासना हा भारतीय परंपरेचा एक भाग होता आणि आजही तो आहे. अगदी ऋग्वेद काळापासून भारतीय वाङ्मय आणि शास्त्रांमध्ये अनेक स्त्री देवतांचे संदर्भ येतात. या संदर्भांशिवाय समाजातील अनेक विधी, परंपरा, सण आणि उत्सव हे स्त्री देवतांसाठी असतात. त्यापैकी नवरात्रोत्सव हा या शक्ति उपासनेचा एक पैलू दाखवणारा घटक आहे. उत्पत्ती हे शक्तीचे साकार स्वरूप […]
Aug 01

सखी परिहास

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर हास्य म्हणजे आपल्या आनंदी जीवनासाठी असलेले उत्तम औषध बनले आहे. त्यामुळे कधी कुणाची चेष्टा करून, कधी शाब्दिक कोट्या करून परिहास म्हणजेच विनोद निर्मिती केली जाते. अर्थात ही आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद देणारी असावी हे जास्त महत्त्वाचे. पण अश्याच वाक् वैदिग्ध्य म्हणजे ज्याला आपण Wit म्हणतो अश्या स्वरूपाचे विनोद काही प्राचीन कलाकृतीतून […]
Jul 20

भारतीय चलन आणि वारसा – रानी की वाव

अगदी प्राचीन काळापासून ते आतापर्यंत पाणी हेच जीवन हे समीकरण आपल्या अगदी परिचयाचे आहे. त्यामुळे पाण्याला केंद्रस्थानी ठेऊन सर्वत्र मानवी जीवन विकसित झाले. दैनंदिन कामांपासून ते शेती आणि इतर व्यवसायासाठी पाणी ही आपली मुलभूत गरज आहे. त्यामुळे जल हा मानवी संस्कृतीत सर्वांत महत्त्वाचा घटक बनला. केवळ आपल्या भारतीय संस्कृतीतीच नव्हे तर बॅबिलोनियन, बल्लुचिस्तान, पर्शियन, ग्रीक, […]

मुलतान येथील सूर्य मंदिर आणि मंदिरातील सुवर्ण मूर्ती

सध्याच्या पाकिस्तान प्रांतामध्ये असलेले मुलतान हे प्राचीन सूर्य उपासनेचे प्रमुख केंद्र होते. मुलतान येथील आदित्य मंदिर हे जगातील सर्वच लोकांचा आकर्षणाचे केंद्र बनले होते. श्रीकृष्णाचा मुलगा सांब याने या सूर्य मंदिराची स्थापना केली, असा पुराणांमध्ये उल्लेख येतो. सांब म्हणजे श्रीकृष्ण आणि जांबवंती यांचा मुलगा. रूपगर्वित सांब याच्या गैरवर्तनाने वडील श्रीकृष्ण त्याला शाप देतात की, त्याच्या […]
Jul 17

लोमश ऋषीगुंफा

बिहारमध्ये बाराबार आणि नागर्जुनी या टेकड्यांचा एक समूह आहे. तिथे लोमाश ऋषी, सुदामा, विश्वामित्र, गोपी, कर्ण चौपार, वापियका आणि वादथिका अश्या इथे एकूण सात गुंफा आहेत. ग्रानाईट या खडकात या गुंफा खोदवल्या आहेत. दगडात कोरलेल्या मानवनिर्मित गुफांचा उगम, विकास आणि त्यांची कलाशैली यादृष्टीने बाराबार येथील गुंफा अतिशय महत्त्वाच्या मानाव्या लागतात. त्यातही सर्वांत महत्त्वाची गुंफा म्हणजे […]