एखाद्या समाजाची एक वैशिष्टपूर्ण रचना, जगण्याच्या पद्धती या एका ठराविक मूल्यांवर आधारित असतात. धर्म, तत्त्वज्ञान, राजकीय किंवा सामाजिक व्यवस्था, साहित्य, शास्त्रे, कला, नीती, कायदा आणि त्या मागची मूल्ये म्हणजे त्या विशिष्ट प्रदेशातील ती संस्कृती असते.
भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आणि अखंडित परंपरा असलेली संस्कृती आहे. त्यामुळे भारताप्रमाणे इतकी अखंडित परंपरा लाभलेले संस्कृती जगभरात बघायला मिळत नाही. भारतीय संस्कृतीपेक्षा प्राचीन संस्कृती निश्चित होत्या, परंतु त्या संस्कृती काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत गेल्या आणि नष्ट झाल्या. त्यामुळे भारतीय संस्कृतीकडे आणि ती शिकण्याकडे, भारतीयांचाच नव्हे तर परदेशी विद्वानांचाही ओढा अधिक होता. म्हणून आपल्याला परंपरेने वारसा म्हणून मिळालेल्या ही संस्कृती म्हणजे काय हे जाणून घेणे आज आवश्यक आहे.
Culture is the characteristic way of life inspired by fundamental values in which people live. It is the sum total of the values expressed through art, religion, literature, social institutions and behavior – K.M. Munshi
ही सांस्कृतिक मुल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होतात तेव्हा त्याला वारसा असे म्हणतात. हा वारसा कधी मूर्त स्वरूपात आपल्या समोर प्रत्यक्ष उभा असतो तर कधी अमूर्त स्वरूपात असतो. या लेखांत आपण भारताच्या अमूर्त वारश्याची माहिती जाणून घेणार आहोत.
अमूर्त वारसा म्हणजे नेमकं काय
अमूर्त वारसा म्हणजे रूढी, परंपरा, विशिष्ट समूहाच्या प्रथा, प्रतिनिधित्व किंवा एखादी ज्ञानशाखा, कौशल्य किंवा अभिव्यक्ती. या सर्व गोष्टींचे आपल्याला अनुभवाने ज्ञान होते. हा अमूर्त वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत आला आहे.
युनेस्को (UNESCO) या संस्थेने भारताच्या अमूर्त वारश्यांची एक यादी केली आहे. त्यात या लोप पावत चालेल्या कला, परंपरा, संस्कृतींची जागतिक स्थरावर नोंद झाली आहे. या अमूर्त वारश्याचे जतन होण्यासाठी आणि त्याची माहिती, त्याचे महत्त्व लोकांना समजण्यास मदत होते.
भारताचा अमूर्त वारसा
1. वेद पठण परंपरा
2. रामलीला
3. कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी
4. रम्मन
5. नवरोझ
6. मुडीयट्टू
7. कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य
8. छउ नृत्य
9. बौद्ध पठण परंपरा, लडाख
10. संकीर्तन
11. पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे थाथेर, जन्दियाला गुरु- पंजाब
12. योग
13. कुंभ मेळा
वेद म्हणजे भारतीयांचे ज्ञानाचे भांडार. पुढच्या भागात भारतातील वेद पठण परंपरा बघणार आहोत.
(क्रमशः)